नागपूर- रात्रकालीन शाळा व शिक्षकांच्या समस्या व जिप शिक्षक, विद्यार्थी व केंद्रप्रमुखांच्या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस महेश जोशी, शरद भांडारकर, नितीन किटे, तारिक अहमद, रवी बोबडे, जावेद शेख यांच्या शिष्टमंडळाने आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना दिले.
निवेदनातील समस्या व मागण्यांवर चर्चे करीता स्वतंत्र वेळ देऊन चर्चा करण्याचे आश्वासन यावेळी राज्यमंत्री कडू यांनी शिष्टमंडळास दिले असून लवकरच बैठक घेण्याचे मान्य केले.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या.
मागणी क्र 1- जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरण्यात यावी.
मागणी क्र 2- गट शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी वर्ग-2 ची रिक्त पदे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची सामाईक सेवाजेष्टता यादी तयार करून अभावितपणे पदोन्नती देऊन भरण्यात यावी.
मागणी क्र 3- जिप शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन सेवापुस्तक अद्यावत करून सेवानिवृत्त झाल्यानंतर तात्काळ पेंशन मिळेल अशी सुव्यवस्था निर्माण करण्यात यावी...
मागणी क्र 4- सर्व शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा मंजूर करण्यात यावी...
मागणी क्र 5- भविष्य निर्वाह निधी (GPF) मधून अग्रीम घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात यावी...
मागणी क्र 6- सर्व विद्यार्थ्यांना सन 2020-21 मध्ये मोफत गणवेश व मोफत स्वाध्याय पुस्तिका पुरविण्यात याव्या....
मागणी क्र 7- सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी...
मागणी क्र 8- सर्व जिप समूह साधन केंद्रात (CRC) ऑनलाईन कामासाठी सुविधा उपलब्ध करून करार तत्त्वावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर ची नियुक्ती करण्यात यावी..
मागणी क्र9- सर्व केंद्रपमुखांना पदोन्नतीची एक वेतनवाढ व दरमहा रु 1650/- कायम प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा....