Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १७, २०२०

महाराष्ट्र सायबरची उल्लेखनीय कारवाई; २९९ लोकांना अटक


६०१ गुन्हे दाखल

बीड येथे नवीन गुन्हा

            मुंबई, दि. १७ :  कोरोना महामारी च्या काळात  राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ६०१  गुन्हे दाखल झाले असून २९० व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
      महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ६०१  गुन्ह्यांची (ज्यापैकी ५७ N.C आहेत) नोंद १६ ऑगस्ट २०२० पर्यंत झाली आहे.
               महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण  ६०१ गुन्ह्यांची (ज्यापैकी ५७ N.C आहेत) नोंद  १६ ऑगस्ट २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
            या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी २१९ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, TikTok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेतइंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, YouTube ) गैरवापर केल्या प्रकरणी ६८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २९९ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १३६ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
बीड
            बीड जिल्ह्यातील शहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ५९ वर गेली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय तेढ पसरु शकेल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट सोशल  मेडियावर टाकली होती.त्यामुळे परिसरातील शांतात बिघडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
ऑनलाईन surfing
            महाराष्ट्र सायबर राज्यातील सर्व नागरिकांना आणि विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते कि आपले पाल्य ऑनलाईन surfing करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची  माहिती करून घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत, किंवा काय वेबसाईट browse करत आहेत यावर लक्ष ठेवा. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे, तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा. जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले कि आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन fraud किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी.
            अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागामार्फत देण्यात आली आहे.           

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.