Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १७, २०२०

थकित पगारासाठी लढणाऱ्या कामगारांना डॉ.भास्कर सोनारकर यांची कामावरून काढण्याची धमकी



चंद्रपूर- 
मागील 6 महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे वेतन मिळालेले नसल्यामुळे कामगारांनी जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक 14 ऑगस्ट 2020 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. 15 ऑगस्ट रोजी कामगारांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिरी कार्यालयात चर्चेसाठी बोलावून पालकमंत्र्यांनी तीन दिवसात पगार जमा करण्याची हमी दिल्यानंतर जन विकास कामगार संघाने आपले आंदोलन स्थगित केले व 16 ऑगस्टपासून सर्व कामगार कामावर रुजू झाले.मात्र पाचशे पैकी दहा-बारा कामगार व्यक्तीगत कामानिमित्त 16 ऑगस्ट रोजी कामावर येऊ शकले नाही.या कामगारांना रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. भास्कर सोनारकर यांनी मेट संजय पिल्ले यांच्या मार्फत बोलावणे पाठवले. आपल्या कक्षात बोलावल्यानंतर 'तुम्ही पगारासाठी आंदोलन करता,तुम्हाला जास्त मस्ती आली,तुम्ही कामावर यायचे नाही, कोणाकडे जायचे ते जा, काय करायचे आहे ते करा,माझे कोणी काहीही करू शकत नाही' असे वक्तव्य करून त्यांनी कामगारांना उद्यापासून कामावर यायची गरज नाही' असे सुद्धा सांगितले. डाॅ. सोनारकर यांची कार्यप्रणाली नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे. काही महिला कामगारांनी त्यांच्या विरुद्ध व्यक्तीगत तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत.

थकित पगारामुळे सर्वच कामगार आर्थिक व मानसिक तणावाखाली जगत आहेत. अशाही परिस्थितीत कामगार जीवावर उदार होऊन covid-19 आपत्तीमध्ये रुग्णसेवा करीत आहेत. मात्र पगारा बद्दल बोलायला गेले की रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सोनारकर कामगारांना धमकावतात. रुग्णालयांमध्ये रक्तदानाच्या क्षेत्रात चांगलं काम करणारे एक डॉक्टर सुद्धा कामगारांवर दबाव टाकण्याच्या भाषेमध्ये बोलतात.डॉक्टरांच्या या वर्तणुकीमुळे उपासमारीची वेळ आलेल्या कामगारांना दुहेरी तणावात काम करावे लागत आहे. सर्व डॉक्टरांचा जन विकास कामगार संघ सन्मान करतो.परंतु डॉक्टरांनी कंत्राटी कामगारांच्या सेवेचा सन्मान केला नाही,योग्य दखल घेतली नाही व उपाशीपोटी काम करणाऱ्या कामगारांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी कायदा हातात घेऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा 'जन विकास' चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे दिलेला आहे.

5 ऑगस्ट रोजी संगीता पाटील या महिला कामगारांचा कामावर असतांना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर शासकीय रूग्णालयातील वातावरण तापले होते. आश्वासन देऊनही 12ऑगस्ट पर्यंत वेतन न मिळाल्याने सर्व कामगारांनी 14 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारले. पालकमंत्र्यांच्या हमी नंतर covid-19 आपत्ती व रुग्णसेवेचा विचार करून 19 ऑगस्ट पर्यंत काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे.तसेच कामगारांचे थकीत पगार जमा झाले नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सुध्दा जन विकास कामगार संघा तर्फे देण्यात आलेला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.