Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १०, २०२०

एकाच्या डोक्यातील आठवणी जातील दुसर्याच्या 👥 डोक्यात!



एकाच्या डोक्यातील आठवणी जातील दुसर्याच्या  👥 डोक्यात! ⭕

➖➖➖➖➖➖➖➖➖
👥न्यूयॉर्क :आपल्या मेंदूत साठवलेल्या काही आठवणी या जेनेटिक कोडमध्ये ठेवलेल्या असतात. त्याला ‘मेमरी सूप’ असेही म्हटले जाते. तिला एका जीवातूनकाढून दुसर्या जीवामध्ये प्रत्यारोपितही करता येऊ शकते. त्यामुळे या दुसर्या जीवातही काही आठवणी अशा राहू शकतील ज्या केवळ पहिल्या जीवातच होत्या. याचा अर्थ एका मोबाईलमधील मेमरी कार्ड काढून दुसर्या मोबाईलमध्ये घातल्यासारखा प्रकार जैविक पातळीवरही करता येऊ शकतो!____________________________

√🔲 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🔲√
____________________________
.            *_{दि. १८ मे २०२०}_*
हे सर्व सायन्स फिक्शनसारखे वाटत असले तरी ते शक्य आहे, असेसंशोधकांचे म्हणणे आहे. लॉस एंजिल्समधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी याबाबतचा प्रयोग यशस्वीही करून दाखवला आहे. त्यांनी एका सागरी गोगलगायीमधील आठवणी काढून दुसर्या गोगलगायीत प्रत्यारोपित केल्या. त्यासाठी त्यांनी एका गोगलगायीतील जेनेटिक मेसेंजरमॉलिक्यूल रीबोन्युक्लिक अॅसिड म्हणजेच आरएनए काढून ते दुसर्यामध्ये स्थापित केले.             
╔══╗ 
║██║      *_⸽⸽M⸽⸽ⒶⒽⒾⓉⒾ_*
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
एका अन्य प्रयोगात त्यांनी प्रयोगशाळेत आरएनए खुल्या न्युरॉनबरोबर पेट्री डिशमध्ये ठेवले. या दोन्ही प्रयोगांमधून दिसले की आरएनएमधील काही गोष्टी ज्या केवळ पहिली गोगलगाय जाणत होती ती आता दुसरीलाही माहिती आहे. या आठवणी अगदी साध्या वाटणार्या आहेत. त्यामध्ये गोगलगायीला मिळालेल्या झटक्याचा समावेश आहे. असे झटकेगोगलगायी कधी विसरत  नाहीत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.