Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १५, २०२०

हुबळीचे एकमेव केंद्र पुरवते राष्ट्रध्वज

⭕हुबळीचे एकमेव केंद्र पुरवते राष्ट्रध्वज⭕ 
_________________________
🇮🇳माहिती सेवा गृप पेठवड़गाव
________________________
https://bit.ly/312TEa5
हुबळी - राष्ट्रध्वज बनवणारे देशभरात एकच अधिकृत केंद्र आहे , ते म्हणजे हुबळीजवळचे बेंगेरी खादी ग्रामोद्योग केंद्र. यंदा या केंद्रातून सुमारे एक कोटी रुपयांची ध्वजविक्री झाली आहे . गेली दोन वर्षेही साधारण एक कोटीच्या घरात विक्री झाल्याची माहिती आहे .🇮🇳
राष्ट्रध्वज बनवण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत ; सूतकताई , रंगकाम आणि शिलाई. कापसापासून चरख्याद्वारे सूतकताई करून ध्वजाचे कापड विणले जाते. या कापडाच्या एक चौरस इंचात 32 उभे आणि 32 आडवे धागे असले पाहिजेत , असा निकष भारतीय मानक विभागाने ( ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस ) ठरवला आहे . त्यामुळे हे कापड बनवण्याचे काम फक्त बागलकोट ( कर्नाटक ) जिल्ह्यातील तुलसगिरी व वेलूरमध्ये चालते . सूत विणून बनलेले कापड फिकट तपकिरी रंगाचे असते . या कपड्याचे तागे हुबळीच्या बेंगेरी केंद्रात मागवले जातात.
🇮🇳 रंगकाम
बागलकोटहून कापडाचे तागे हुबळीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे "ब्लीचिंग ' करून ते कापड पांढरे शुभ्र बनवले जाते. त्यानंतर काही ताग्यांना केशरी रंग , तर काही ताग्यांना हिरवा रंग दिला जातो . रंगांचा " पीएच' आणि " स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू ' बीआयएसच्या मानकाप्रमाणे असते . त्यानंतर पांढऱ्या कापडावर निळ्या रंगाचे अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग तंत्राद्वारे छापले जाते.♍ https://bit.ly/312TEa5
🇮🇳 शिलाई
तिरंगा ध्वज सलग एकाच कापडाचा नसतो , तर तीन कापडे जोडून शिवलेला असतो. तीन एकक लांबी आणि दोन एकक रुंदी होईल , अशा प्रमाणात तीन रंगांचे तुकडे शिलाई मशिनवर जोडले जातात. केशरी तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना शिलाईसाठी केशरी दोरा वापरला जातो . तर हिरवा तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना हिरवा दोरा वापरला जातो . त्यामुळे दुरून पाहिले असता एकाच कपड्याला तीन रंग दिले असल्याचा भास होतो . प्रत्यक्षात तिरंगा बनतो तो तीन रंगांचे प्रमाणबद्ध कापलेले तुकडे जोडून !
खास🇮🇳 खोबण
तिन्ही तुकडे एकमेकांना शिलाईने जोडल्यानंतर एका बाजूला खास शिवून तयार केलेली खोबण ( स्लीव्ह ) जोडली जाते. ही खोबण हातमागावर तयार केलेली असते . ती वरून खाली अशी जोडली जाते. शिवाय , खोबणीचे वरचे तोंड बंद केले जाते . एकदा ध्वज शिवून तयार झाला की तो " स्टीम इस्त्री ' केला जातो . त्यानंतर तो  पिशवीबंद केला जातो . हुबळीतील या केंद्रात बीआयएसच्या मानकानुसार 9 विविध आकारांचे राष्ट्रध्वज तयार केले जातात.♍



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.