Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १३, २०२०

ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन करावा:महावितरणचे आवाहन

महावितरणचे निम्मे ग्राहक डिजिटल | eSakal
नागपूर(खबरबात):
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रीडिंगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे.

ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे वीजबिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना नाहक त्र꠰स सहन करावा लागू शकतो.

तसेच कोविड -19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करणे सद्यस्थितीत सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य द्यावे. ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल ॲप तसेच www.mahadiscom.in या वेब साईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.