नागपूर/अरूण कराळे (खबरबात):
केंद्र शासनाच्या कापूस महामंडळाने अधिकृत केलेले कापूस खरेदी केंद्र चालक पुरेशा प्रमाणात कापूस खरेदीकरीत नसल्याने ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे .टाळेबंदीमुळे सध्या जग थांबले आहे .आता शेतकऱ्यांना खरीपाच्या तयारीसाठी कामे करायची आहे. त्यातही नागपूर तालूक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज देण्यास बँकेचे व्यवस्थापक अटी व शर्थी सांगून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. बँकेच्या चकरा मारून शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज देण्यात यावे ,शेतकऱ्याचे विज बिल माफ करण्यात यावे.शेताच्या बांधावर बी- बीयाने खते देण्यात यावे,प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान खात्यात जमा करण्यात यावे आदी मागण्याचे निवेदन बुधवार ३ जुन रोजी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांना भाजपा वाडी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गमे यांच्या नेतृत्वात वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे ,पं. स. चे माजी उपसभापती सुजित नितनवरे ,भाजपावाडी मंडळाचे माजी अध्यक्ष आंनदबाबू कदम , दवलामेटी सर्कल प्रमुख प्रकाश डवरे ,भोजराज घोरमाडे ,दिनेश डिवरे ,शशीकांत खोंडे ,सरपंच प्रफुल ढोके ,सुधाकर ठाकरे ,अशोक गमे ,विजय राऊत यांच्या उपस्थितीत देण्यात आले.