*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वासू सहकारी म्हणून ज्यांनी आंबेगाव तालुक्याचे नाव सातासमुद्रापलीकडे नेले असे कर्तव्यनिष्ठ व दुरदृष्टीकोन असणारे नेते म्हणजे आर जी खरात
रामचंद्र गेनूजी खरात यांचे मुळगाव वचपे ता आंबेगाव जि पुणे की जे डिंभे धरणाच्या बुडीत क्षेत्रात आता गेले आहे पण त्या काळात आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठे गाव या गावात ७ जून१९२० रोजी खरात साहेबांचा जन्म झाला परिस्थिती जेमतेम असलेले खरात साहेब यांचे गावात शिक्षण ७ वी पास पर्यंत भिकाजी पन्हाळे गुरुजी यांच्या मार्गदना खाली झाले त्या काळात खरात साहेबाना ९८% मार्क पडले यामध्ये त्यांची बुद्धिमत्ता कळली होती म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या प्रमाणे त्यांच्या हुशारीची चुणूक सातवीत कळल्या नंतर तालुका शिक्षण अधिकाऱ्यांनी या मुलाला पुण्यात शिक्षण द्यावे असा शेरा मारला होता परंतु परस्थिती मुळे जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत आले नाही पुढे काही काळात म्हणजे १९४० च्या दरम्यान साहेबांनी वचपे या गावापासून मुंबईला जाण्याचे ठरविले आणि पण मुंबईला जायला पैसे नाहीत पण खरात साहेब दृढ निश्चयी होते त्यांनी वचपे ते आहुपे आणि आहुपे ते खोपोली असा पायी प्रवास केला आणि खोपोलीतुन खाजगी ट्रकने मुंबई गाठले ध्येय उराशी बाळगून साहेबांनी पिठाच्या चक्कीत नोकरी मिळवली तेथे ते कामात रमले कारण जे काम हाती घेत ते तडीस नेण्याचा प्रयत्न असे पुढे काम करीत असताना त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले याचे शल्य त्यांना कायम सतावत होते पण त्याच काळात त्यांनी पावसाळी छत्र्या दुरुस्त करण्याचे काम केले कारण त्यांच्यात जिद्द व चिकाटी होती कितीही मेहनत घ्यायची तयारी होती कारण त्यांनी गरिबीचे चटके बसलेले होते कारण त्यांच्या मागे आई ,वडील ,तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार होता आणि त्यांना सुखी ठेवायचे होते कारण प्रथम कुटुंब व्यवस्थित ठेवले तर समाजकार्य करणारा माणूस समाजात काम करू शकतो याच काळात त्यांनी आई वडील व भावंडाना मुंबईला बोलावून घेऊन एकत्र राहू लागले आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा आधार व आदर्श मनात ठेवून सकाळी कामधंदा करून रात्रीच्या शाळेत शिक्षण सुरू केले आणि त्या काळी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली आणि शिक्षणाचे अधुरे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केले या नंतर सातारच्या मामा कडून खरात साहेबाना "सिपला या औषध कंपनीत नोकरी मिळाली आणि डबे साफ करण्याचे काम मिळाले परंतु शिक्षण चांगले असल्यामुळे खरात साहेबांच्या शिक्षणाला न्याय मिळाला आणि ते सुपरवायझर झाले आणि तेंव्हा पासून ते आर जी खरात साहेब या नावाने ओळखले जाऊ लागले.
आर जी खरात साहेबाना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी प्रचंड आदर होता. त्यामुळे ते बाबासाहेबांच्या सहवासात सतत असत मुंबईतील १९४७ च्या हिंदू मुस्लिम दंगल मध्ये दोन्ही समाजाला शांतता राखणे बाबत प्रयत्न करणारे खरात साहेब खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरेत आले हिंदू मुस्लिम दंगलीच्या वेळेड खरात साहेबांनी केलेले शांतता प्रस्थापणेचे कार्य पोलीस खात्यात होतेच या कार्याची दखल जागतिक स्तरावर World Confidence of Religion For Piace या संस्थेने घेतली तेंव्हा पासून ते सामाजिक कार्य आणि डॉ बाबासाहेबांच्या बरोबरीने काम करू लागले आणि पुढे १९४८ साली भायखळा येथून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आंबेगाव तालुक्याच्या इतिहासात मुंबई नगरीत वचपे गावचे आर जी खरात साहेब नगरसेवक झाले त्या काळात त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली
आर जी खरात साहेबांनी सलग १९४८ पासून तर १९६८ पर्यंत नगरसेवक पद भूषविले तर काही समित्यांचे अध्यक्ष पद ही भूषविले या त्यांच्या कार्य काळात संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भायखळा ते किंगसर्कल या रस्त्याला देऊन चळवळीच्या कार्यक्रर्त्याना प्रेरणा देण्याचे काम केले आहे तर दादरच्या चैत्यभूमीला जागा मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले १९५१ या वर्षी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समाजाच्या कार्यासाठी आर जी खरात साहेब यांच्या हस्ते मुंबईच्या जनतेने जमविलेले ५१ हजार रुपयांची थैली देण्याचा मान मिळाला यामुळे ते जनमानसात विश्वासू होते खरात साहेबांनी बाबासाहेबांच्या अनेक सभा मध्ये अध्यक्ष पद भुषवले आहेत हा सन्मान आपल्याच मातीत जन्म घेणाऱ्या आर जी खरात साहेबाना मिळाला साहेबांनी सतासमद्राच्या पलीकडे आपल्या तालुक्याचा ठसा उमटविला सन१९७६ साला मध्ये बँकॉक मध्ये होणाऱ्या बौद्ध परिषदेला देशा मधील प्रतिनिधी म्हणून मान मिळाला .
आर जी खरात साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक संस्था मध्ये अनेक पद भूषवली आहेत त्या मध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये अध्यक्ष पद ,शेड्यूल्ड कास्ट इम्प्रेमेंट मध्ये अध्यक्ष पद त्याच प्रमाणे म्युन्सीपल कामगार संघ या मध्ये अध्यक्ष होते तर डॉ बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सीसायटी या शिक्षण संस्थेत सदस्य म्हणून कार्यरत होते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्वाच्या संस्था मध्ये काम करणे म्हणजे आर जी खरात साहेब हे डॉ बाबसाहेब यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते महामानवाचा विश्वास संपादन करून समाजाचे कार्य करणारे आर जी खरात साहेब खरोखर आंबेगाव तालुक्यासाठी महानच होते
प्रचंड मेहनतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरी ने काम करून त्यांचे विचार आचार आचरणात आणून समाजाला परिवर्तन करण्याचे कार्य ह्या महान व्यक्तीकडून झाले याचा आम्हा आंबेगाव कराना अभिमान आहे आर जी खरात साहेब हे नेहमी सुटा बुटात राहायचे कारण ते सच्चे बाबासाहेबांचे अनुयायी होते अशी अनेक समाजोपयोगी कार्य त्यांच्या हातून घडली आणि समाज सुधारणे साठी अहोरात्र काम केले आणि आंबेगाव तालुक्याचे नाव साता समुद्र पलीकडे नेले
पण शेवटी पायला भिंगरी लावून फिरणारे आर जी खरात याना साधारण आजार झाला मलेरिया सारखा ते सेंट जॉर्ज हॉस्पिटलला ऍडमिट असताना त्यांनी ८ जून १९९५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वासू सहकारीजनतेच्या हिताची कामे करणारा सतत लोकांचा विचार डोक्यात असणारा समाजचर हीत पहाणारा नेता काळाच्या पडद्या आड झाला त्याच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे चालविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (गवई गट) मुंबई प्रदेश चे अध्यक्ष मा आनंदराव खरात (दादा) ह्यांनी पुढे चालू ठेवला आहे हे खरात साहेब यांचे कार्य त्यांच्या माध्यमातून समाजात होत आहे
आशा महान कर्तृत्वान आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या महान नेत्यास त्यांच्या २५ व्या स्मृती दिना निमित्त तमाम आंबेगाव च्या तमाम जनतेच्या वतीने आणि युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने विनम्र अभिवादन!!
- गौतम खरात