मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकाची अवहेलना
मुख्य अभियंत्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
*खापरखेडा-प्रतिनिधी*
संपूर्ण जगाला कोरोना वायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे त्यामुळे भितीचे वातावरण पसरले असून देशासह राज्यात कोरोना वायरसच्या रुग्णाची संख्या वाढत आहे केंद्र व राज्य शासन अनेक उपाययोजना करीत आहेत राज्यातील संबंधित विभाग वेळोवेळी दिशानिर्देश देत आहे मात्र खापरखेडा औष्णिक विज केंद्र याला अपवाद असून येथील मुख्य अभियंताचा मनमानी कारभार सुरू आहे महानिर्मितीच्या मुख्य कार्यालयाने वेळोवेळी परिपत्रकाच्या माध्यमातून स्थानिक विज केंद्र प्रशासनाला सूचना केल्या मात्र परिपत्रकाची अवहेलना करण्यात आली त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली असून मुख्य अभियंत्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खापरखेडा येथील दोन औष्णिक विज केंद्राच्या माध्यमातून एकूण १३४० मेगावॅट निर्मिती केल्या जाते मात्र राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने खापरखेडा औष्णिक विज केंद्रातील २१० मेगावॅटचे ४ संच २५ मार्चला बंद करण्यात आले तर ५०० मेगावॅटचा १ संच ३१ मार्चला बंद करण्यात आला आहे विज निर्मिती केंद्र बंद करण्यात आलेत मात्र विज निर्मिती अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याचा हवाला देत कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येत आहे यासंदर्भात खापरखेडा पोलीसांना ३१ मार्च रोजी येथील मुख्य अभियंत्यांकडून पत्र देण्यात आले आहे सदर पत्रात विज निर्मिती करण्यास दररोज २००० हजार कंत्राटी कामगार व १२०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज भासत असल्याचे नमूद करण्यात आले असून संपूर्ण देशात लॉक डाऊन संचारबंदी दिनांक १४ मार्च २०२० पर्यंत लागू करण्यात आली आहे त्यामुळे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रास सूट देण्याची विनंती खापरखेडा पोलिसांकडे करण्यात आली आहे कोरोना वायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी सुरू करण्यात आली आहे मात्र विज केंद्र बंद असतांना अनावश्यक कामगारांची गर्दी कश्यासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महानिर्मितीच्या विश्रामगृहात अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे आदेश
राज्यात व जिल्ह्यात कोरोना वायरसचे रुग्णाची संख्या वाढू लागली आहे त्यामूळे भितीचे वातावरण पसरले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहेत खापरखेडा औष्णिक विज केंद्रात कार्यरत कर्मचारी, अधिकारी, अभियंते, सुरक्षारक्षक मुख्यालयी राहने अपेक्षित आहेत मात्र ते नागपूरसह अन्य ठिकाणावरून ये-जा करीत आहेत सदर बाब विज केंद्रासाठी धोक्याची घंटा आहे अश्या बाहेरगावी राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था महानिर्मितीच्या विश्रामगृह व कार्यालयात करण्याचे आदेश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती शैला ए. यांनी ३१ मार्चला दिले आहेत मात्र अजूनही व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे नागपूरसह अन्य ठिकाणावरून येणाऱ्या कर्मचारी व अधिकारी,अभियंते, सुरक्षारक्षक यांची वैद्यकीय चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकाची अवहेलना
राज्यात कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानिर्मिती कंपनीच्या मानव संसाधन विभागाकडुन १९ मार्चला महानिर्मिती/मास/देयके/२६८४ क्रमांकाचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले सदर परिपत्रकात विज केंद्रात कार्यरत ५०% अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या मात्र तब्बल पाच दिवसानंतर २३ मार्च रोजी खापरखेडा औष्णिक विज प्रशासनाने परिपत्रक प्रसिद्ध केले त्यामुळे येथील मुख्य अभियंता आपत्तीकालीन व्यवस्थापनात किती गंभीर आहे दिसून येते महानिर्मिती मुख्य कार्यालय प्रशासन वेळोवेळी दिशानिर्देश देत असतात मात्र त्यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत असल्यामुळे हिटलरशाही कारभार सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.
*अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर*
विज केंद्रात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता बाबतीत सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविणे अपेक्षित आहे मात्र विज केंद्रात नोज मास्क, डेटॉल सोडले तर कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शैला ए. यांनी ३१ मार्चला एक परिपत्रक प्रसिद्ध करून विज केंद्रात काम करणाऱ्या वेतनगट ३ व ४ मधील तांत्रिक/आतांत्रिक संवर्गातील कर्मचारी व कंत्राटी कामगारांना सॅनिटाईझर खरेदी करण्या करिता १ हजार रुपये देण्याच्या सूचना केल्या आहेत शिवाय सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचाऱ्यांना हॅन्ड सॅनिटाइझर व मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र डेटॉल हॅन्ड वाश व्यतिरिक्त काहीही उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती कामगार सूत्रांनी दिली आहे.
वीज कामगार वसाहतीत सुरक्षित
कोरोना वायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे अपेक्षित आहे राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने विज केंद्र बंद करण्यात आले आहे विज केंद्रात अत्यावश्यक काम असल्यास प्रकाशनगर वसाहतीतील कर्मचारी कर्तव्यावर बोलविणे अपेक्षित आहे विज केंद्रात गर्दी कमी होईल याकडे लक्ष देने गरजेचे असून यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही यासंदर्भात उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत यांच्याशी संपर्क साधला असता नागपूर व अन्य ठिकाणावरून कर्मचारी येणे ही गंभीर बाब असल्याचे मान्य करून काही बोलण्यास नकार दिला.