भूपेंन्द्र गणवीर - ज्येष्ठ पत्रकार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विधान म्हणजे एका दगडात दोन प्रहार. कोरोनाबाबत केंद्र सरकार सिरियस नाही. भाजप सांप्रदायिकता पसरवित आहे. या विधानाचा हवा तसा परिणाम दिसला. भाजप नेते तिलमिला उठे. अनेक जण बाहेर निघाले. सोनिया गांधींवर हल्लाबोल केला. पालघर प्रकरणाच्या आड ठाकरे सरकारची कोंडी करण्यास भाजपवाले सरसावले होते. उठसुठ जो¢¢ तो ठाकरे सरकारला बडवित होता. साधूंची हत्या झाली .पोलिस बघत राहिले. दिल्लीपासून त्रिकोणी मैदानापर्यंत सारेच बोलते झाले. त्या पालघर आड सोनिया गांधी बोलल्या. या विधानाने महाराष्ट्र सरकारला मोठी रसद मिळाली.आता भाजपवाल्यांची धरले तर चावते. सोडले तर पळते अशी अवस्था झाली. नाहक पाराचा कावळा बनविणे चालू होते. त्याला भाजप सांप्रदायिकता वाढवत आहे असे म्हटले तर चुक काय ? या आरोपाची संधी तुम्हीच दिली. यामुळेच कोरोनावरून सरकारवर टिका करावी लागली. पालघरच्या आड तब्लिगींच्या अनुल्लेखाने नाराज समाज सुखावला असेल तर त्यात सोनिया किंवा काँग्रेसचा काय दोष. शहाण्यांनी काळ वेळ बघून बोलावे म्हणतात.त्याचे भान नसेल तर अशी अवस्था ओढावते. गावखेड्यात यास म्हणतात. आ बैल मुझे मार.
राईनपाडा ते गडचिचले
कोरोनाने राज्य सरकारची झोप उडाली . त्यात पालघर प्रकरणाने नवी डोके दुखी वाढली. माँब लिंचिंगच्या घटना देशात वाढल्या आहेत. एका सरकारी आकडेवारीनुसार २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत ४० घटनांमध्ये ४५ जणांची हत्या झाली. त्यावर सर्वोच्च न्यायालयालला स्वत: दखल घ्यावी लागली होती. तेव्हा सरकारमधील लोक मौनात होते. फडणवीस सरकारच्या काळात वर्षभरापुर्वी धुळे जिल्ह्यातील राईनपाड्यात एक घटना घडली होती . गोसावी समाजाचे लोक भीक मागून उदरनिर्वाह करतात. तेव्हा मुलं पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा होती. या अफवेतून ५ गोसावींची राईनपाड्यात हत्या झाली होती. तेव्हा धुळ्याचे मित्र वरिष्ठ संपादक योगेंद्र जुनागडे यांनी व इतरांनी खूप लिखाण केले. गोसावी साधू हत्या प्रकरण जगभर गाजले. त्या गोसावी साधू हत्येवर सर्वजण मौन होते. ते आज सर्वजण बोलत आहेत. ते ५ गोसावी साधू भटक्या जमातीचे होते. तेव्हा ५ जणांची हत्या एवढाच मर्यादित विषय होता. फारसी कोणी दखल घेतली नव्हती. जमावाने हत्या केली होती. त्यानंतर राज्यातील ही दुसरी मोठी घटना होय.
व्हाट्सअप नियम
राईनपाडा घटनेची तेव्हा व्हाट्सअपने दखल घेतली. शंभरावर संदेश पाठविण्याच्या अधिकारावर मर्यादा आणली. तेव्हापासून केवळ ५ संदेशच पाठविता येतात. ही व्हाट्सअप देन महाराष्ट्राची आहे. ही घटना मोबाईल धाकरकांसाठी एैतिहासिक झाली. राईनपाडा हे गाव गुजरातच्या सिमेला लागून. पहाडी व वर्दळ नसलेले गाव. या घटनेतील आरोपी अद्याप नाशिक जेलमध्ये आहेत. पालघर जिल्ह्यातील गडचिचले हे गावही गुजरात सिमेला लागून. या घटनेबाबत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या राज्यात अशा अनेक घटना आहेत. बुलंदशहरात एका युवकासह ठाणेदार सुबोधसिंह यांची हत्या झाली. हा गोरक्षकांचा जमाव होता. ही घटना एक अपघात असल्याचे तेव्हा म्हणाले होते. दोन साधूंसह चालक अशी तिघांची हत्या गावकऱ्यांनी केली. या जमावाने पोलिसांनाही जुमानले नाही.चोर समजून त्यांची हत्या केली.कोरोनामुळे राज्यभर ये-जा मनाई असताना साधूंनी जंगल मार्गाने जाण्याचे धाडस करावयास नको होते. चुक कोणाची असो . हत्या निषेधार्ह आहे. ती मग साधुंची असो की सामान्याची. त्यात सोयीचे असेल त्याचे राजकारण होते. नेमके हेच महाराष्ट्रातील घटनेवर सुरू आहे. सीएम योगी आदित्यनाथ, देशाचे गृहमंत्री अमित शहा, उमा भारती, माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीससह अनेक भाजप नेते तोंड उघडतात. ठाकरे सरकारवर रोष व्यक्त करतात. सीएम उध्दव ठाकरे पुढे येतात. या घटनेस वेगळा रंग देवू नका. धार्मिक तेढ निर्माण करू नका असे आवाहन करतात.तरी बोलबच्चन थांबत नाहीत. गृहमंत्री अनिल देशमुख पुढे येतात. अटक केलेल्या शंभरावर लोकांची यादी जाहीर करतात. ठाकरे सरकार प्रामाणिकपणे कोरोना विरोधात लढत आहे. तरी मुंबई, पुणे, नागपुरात रूग्ण वाढत आहेत. सर्व यंत्रणा त्यात गुंतली असताना पालकर प्रकरणात तेल ओतणे अक्षम्य आहे.
रेल्वे सोडा
राज्य सरकार हक्काचा निधी केंद्र सरकारकडे मागत आहे. तो दिला जात नाही. निधी देताना पक्षपात होत आहे. सरकारकडे पैसा नाही. हक्काचा पैसा महाराष्ट्रतील जनतेच्या कामात येत नसेल तर त्यावर बोला काही. राज्याच्या संयमाच्या परीक्षेच्या भानगडीत पडू नका. तुम्ही पैसेही देणार नाही. परप्रांतिय सहा लाखावर मजूरांना परतही पाठवणार नाही. त्यांच्यासाठी रेल्वे सोडणार नाही. उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तर दोष द्यावयास मोकळे. हे चालणार कसे? परप्रांतिय मजूर महाराष्ट्रात संवेदनशील विषय आहे. याचे भान दिल्ली सरकारला नसेल तर कसले सरकार. ठाकरे सरकारची जिरवावयाची असेल तर गोष्ट वेगळी . पण हा खेळ अंगलट येवू शकते. उध्दव ठाकरे २० मार्चपासून सांगत आहेत. रेल्वे सोडा मजूरांना त्यांच्या राज्यात परत जावू द्या.पियूष गोयल मुंबईचे तरी त्यांच्या कानापर्यंत आवाज जात नाही. हे काय चालू आहे. देशभर मजूरांना वेठीस ठेवल्यासारखी स्थिती आहे. कोंबून ठेवण्यात आले. त्यांना कोरोनाचा धोका नाही. विदेशात अडले त्यांना विमाने पाठवून आणले. त्यांना धोका आहे. सरकारचे हे दोहरी मापदंड आहे. गरिब मजूर रडत आहे. पाषाण ह़्दयी सरकारला दया नाही.पाजर फुटावे. एवढी अपेक्षा. जनता सबकुछ देखती है.
साधू कनेक्शन
या साधुंचा कंनेक्शन जुना आखाड्याशी आहे. तर या आखाड्यांचा संबंध युपी, गुजरातशी आहे. देशात असे १३ आखाडे आहेत. त्यात जुना आखाडा सर्वात मोठा. जुना हा गुजराती शब्द असल्याचे बोलले जाते. या आखाड्यातच नागा सांधूंचाही समावेश आहे. या आखाड्यात चार लाखावर साधू असावेत असा अंदाज आहे. या कारणांमुळे साधूना भडकविण्याची खेळी होती. राज्य सरकारने ती ओळखली. ठाकरे, देशमुखांनी गतीने सत्य समोर आणल्य़ाने अनेकांची गोची झाली. उरलीसुरली कसर शरद पवार यांनी पुर्ण केली. हे सरकार अस्थीर करण्याचे डाव आहेत.हे उघड दिसते.
लक्षणविरहित शत्रू
कोरोना हा अदृश्य शत्रू. तो कसा आला. कसे बांधित केले. हे कळतच नाही. कोरोनाबांधिताचा संपर्क नको. त्यासाठी लाँकडाऊन केले. सर्दी, खोकला, ताप ही त्याची लक्षणे. कांहीमध्ये ही लक्षणे तीन दिवसात दिसतात. कांहीमध्ये १४ दिवसानंतर लक्षणे आढळतात. खबरदारी म्हणून संशयितांना १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवणे सुरू झाले. मात्र आता अजिबात लक्षणे नसलेले कोरोना बांधित आढळले. हे अगोदरही आढळले. मात्र त्यांची फार वाच्यता झाली नाही. मुंबईतील १६० पत्रकारांची कोरोना चाचणी झाली. त्यात ५३ पत्रकार कोरोना बांधित आढळले. हे सर्व लक्षणविरहित आहेत. या बातमीने सरकारची झोप उडाली. अदृश्य आजार. त्यात लक्षणेही अदृष्य. तुमच्या आसपास कोण आहे. हे कळतच नाही. आयसीएमआरकडे विचारणा करण्यात आली. त्या संस्थेने सांगितले लक्षणं नसलेली रूग्ण आढळत आहेत. त्यांचे प्रमाण ६९ टक्के आहे. याचा अर्थ चाचणी केल्याशिवाय तरणोपाय नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाँकडाऊन हा उपाय नाही.जास्तच जास्त टेस्टिंग केल्या तरच कोरोना नियंत्रणात येईल हे ठणकाऊन सांगितले. त्यावर उपाय सांगितले. उपचाराची साधणे हवी आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले. इतर देशांनी साठेबाजी केली. आता साधणे कमी मागणी जास्त वाढली. स्थिती बिकट आहे.
देशात २० हजारावर कोरोना रूग्ण आढळले. झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. रँपिड टेस्ट किट फेल निघाल्या. राजस्थान सरकारने तक्रार केली. देशभरातील रँपिड टेस्ट थांबविण्यात आल्या. ती चिंता सोडून गडचिचलेचा जप सुरू आहे.
BG
..........×××××...........