संचालक मंडळाच्या सभेत मंजुरी
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या संचालक मंडळाची सभा नागपूर येथे आज (३१ डिसेंबर) संपन्न झाली|
नागपूर स्मार्ट सिटी चे मेंटोर आणि चेयरमेन, बॄहन्मुंबर्इ महानगर पालिकेचे आयुक्त श्री. प्रविण परदेशी अध्यक्ष स्थानी होते. यावेळी महापौर श्री. संदीप जोशी, स्थायी समिती सभापती श्री. प्रदीप पोहाणे, सत्ता पक्ष नेता श्री. संदीप जाधव, बसपा पक्ष नेता श्रीमती वैशाली नारनवरे, नगरसेविका श्रीमती मंगला गवरे, पोलीस आयुक्त डॉ. भुषण उपाध्याय, आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी श्री. रविन्द्र ठाकरे, संचालक श्री. अनिरूध्द शेणवार्इ आदि उपस्थित होते. सभेस आमदार श्री. कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे विशेष निमंत्रित म्हणून होते.
स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी महापौर श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनिषा कोठे सत्तापक्ष नेते श्री. संदीप जाधव, ब.स.पा.पक्ष नेत्या श्रीमती वैशाली नारनवरे आणि जिल्हाधिकारी श्री. रविन्द्र ठाकरे श्री. दिपक कोचर यांची संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले.
श्री.प्रविण परदेशी यांनी प्रोजेक्ट टेंन्डर शुअर च्या अंमलबजावणी साठी लोकप्रतिनीधी आणि प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती प्राप्त होत असल्यामुळे समाधान व्यक्त केले व सदर प्रकल्प पथदर्शी असल्यामुळे नागपुर शहरातील इतर अविकसित भागात देखिल राबवीण्यात यावा तसेच रस्त्याचे निर्माण कार्य लवकरात लवकर पुर्ण करावे असे निर्देश दिले.
नागपूर स्मार्ट सिटी च्या वतीने पारडी भरतवाडा पुनापूर आणि भांडेवाडी क्षेत्रात १० किमी मार्गाचे निर्माण कार्य सुरु केले आहे. या क्षेत्रात लोकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी ४ ओव्हरहेड टाकीचे निर्माण कार्य प्रारंभ केले आहे. नाग नदी वर लहान आणि मोठया पुलाचे बांधकाम सुध्दा सुरु करण्यात आले आहे.
संचालक मंडळाने ३० विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी प्रदान केली. यातील प्रमुख विषय या प्रमाणे आहेत.
1. पुर्नवसाहत आणि पुर्नवसन धोरण
संचालक मंडळातर्फे पुर्नवसाहत आणि पुर्नवसन धोरण मध्ये सुधारणा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रकल्प बाधितांना भाडयाचे घर घेण्यासाठी रूपये ५००० किमान भाडे देण्यासाठी मंजुरी दिली. तसेच वाणिज्य व औदयोगीक क्षेत्रातील बाधीतांना रू. १०००० भाडे देण्याची परवानगी दिली. प्रकल्प बाधीतांचे घर ७०० वर्गफुट पेक्षा जास्त असल्यास त्यांना प्रती वर्गफुट रू.७.५० अतिरीक्त देण्यात येर्इल. स्मार्ट सिटी च्या वतीने आता पर्यंत ४३ प्रकल्प बाधितांना रू. २.९२ कोटी मोबदला स्वरूपात वितरीत करण्यात आले त्यास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.
2. PV To EV
स्मार्ट सिटी फेलो तर्फे तयार करण्यात आलेल्या सौर उर्जेवर आधारीत इलेक्ट्रीक व्हेहीकल चार्जिंग स्टेशनच्या मोरभवन येथे उभारणीला मंजुरी प्रदान करण्यात आली. अपारंपारीक उर्जा स्त्रोताच्या माध्यमाने इलेक्ट्रीक बसची बॅटरी चार्ज करण्यात येर्इल. नागपूर महानगर पलिकेची इलेक्ट्रीक बस आणि खाजगी कार वाहनांची बॅटरी चार्ज करण्यास मदत होर्इल या प्रकल्पाकरीता रू. ४ कोटी खर्च अपेक्षित आहे.
3. झिरो वेस्ट धोरण
संचालक मंडळ नी झिरो वेस्ट धोरणाला मंजुरी प्रदान केली आहे. स्मार्ट सिटी फेलो नी हा प्रकल्प तयार केला असुन या धोरणाच्या माध्यमाने सुका कचरा रिसायकल करण्यात येर्इल. महीला बचत गटाच्या माध्यमाने महीलांना रोजगार उपलब्ध होर्इल. याचा प्रारंभ धरमपेठ झोन मधुन करण्यात येर्इल. या प्रकल्पासाठी संचालक मंडळानी रू. ३४.१८ लाख च्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली