मायणी ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे)
गुंडेवाडी मराठा नगर या गावात गेली तीस वर्ष स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या विचारांची पाठराखण केली आहे या गावाने मताचे मानाचे दान यांना दिले आहे त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी मी गुंडेवाडी च्या विकासासाठी कटिबद्ध असून सरकार कोणाचे असले तरी विकास कामे खेचून आणण्यासाठी मी सदैव तयार आहे गुंडेवाडी चा विकास हाच माझा ध्यास असल्याचे स्पष्ट मत युवानेते सचिन गुदगे यांनी गुंडे वाडी येथे बोलताना केले येथील राज लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मंदिर या मंदिराजवळ पंचवीस बाय पंधरा योजनेअंतर्गत हाय मॅक्स चे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या भाषणात सचिन पुढे म्हणाले सत्ता येते व जाते पण विकास हा महत्त्वाचा असतो विकासामुळे जीवन मान सुधारते यापुढील काळात आपण ग्रामसचिवालय गाव तोच रस्ता ही कामे करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी मायणी चे माजी सरपंच महादेव यलमर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके माजी सरपंच वसंत मारुती उदडे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामस्थांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन दरबारी आपण ठोस भूमिका माडण्याचे निवेदन दिले या कार्यक्रमास संतोष निकम उपसरपंच ,सुभाष निकम, सुभाष विठोबा अवदडे, विश्वनाथ शंकर निकम सिताराम निकम तानाजी विष्णू कदम लक्ष्मण ज्योती निकम लक्ष्मण भानुदास थोरात ज्योती सुभाष विठोबा निकम ,रामचंद्र निकम, तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी सुभाष निकम यांनी आभार मानले