• महा मेट्रो आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार
• मेट्रो स्टेशन होणार चार्जिंग स्टेशन
नागपूर ०८ ग्रीन थीम संकल्पनेवर आधारित महा मेट्रो नागपूर प्रकल्पात मेट्रो स्टेशनवर सोलर पॅनल लावण्यात आले आहे. नागपूर मेट्रो स्टेशन वर आता पर्यत ९६५ सोलर पॅनल लावण्यात आले आहे तसेच ६५% उर्जा ही सौर उर्जा प्रकल्पातून घेण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. आज पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महा मेट्रोने आणखी एक पाऊल घेत उर्जा दक्षता सेवा लिमिटेड(Energy Efficiency Service Limited) या भारत सरकार,उर्जा मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रोक्यूरमेट विभाग) श्री. आनंद कुमार आणि उर्जा दक्षता सेवा लिमिटेड विभागाचे (पूर्व महाराष्ट्र) प्रादेशिक प्रमुख श्री. किशोर चव्हाण यांनी या सामंजस्य करारवर संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथुर,संचालक(प्रकल्प) श्री.महेश कुमार,संचालक(वित्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांक्षर केले.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी सातत्याने सौर उर्जेच्या वापरावर भर दिला आहे म्हणूनच नागपूर मेट्रोच्या चार स्टेशन तसेच मेट्रो भवनवर सौर पॅनल लावणे त्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात सौर उर्जेची निर्मिती व वापर होत आहे. महा मेट्रो टप्या टप्याने मेट्रो सर्व स्टेशनवर सौर उर्जेचे पॅनल बसविणार आहे. पर्यावरणपूरक मेट्रोची संकल्पना राबवताना मेट्रो स्टेशन येथे चार्जिंग पॉईंट स्थापन करण्यासंबंधीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालय द्वारे दिनांक ७ मार्च २०१८ रोजी राष्ट्रीय ई-मोबिलीटी कार्यक्रम आखल्या गेला.या अंतर्गत ई-वाहन आणि सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा मुख्य मानस आहे. या अनुषंगाने आज हा सामंजस्य करार करण्यात आला. सदर सामंजस्य करार मध्ये नागपूर मेट्रोच्या मेट्रो स्टेशन येथे उर्जा दक्षता विभागातर्फे चार्जीग उपकरण व विद्युत व्यवस्था बसविण्यात येईल व त्या मोबदल्यात महा मेट्रोला या जागेचा किराया मिळेल.
आता पर्यंत दिल्ली आणि चेन्नई येथे ही सेवा उपलब्ध होत असून आता, या पाठोपाठ नागपूरला देखील ही सोय होत असल्याने शहराचे महत्व निश्चीतच वाढणार आहे. महत्वाचे म्हणजे मेट्रो स्तेशनवर वाहनांच्या चार्जीगची सोय होणार असल्याने इलेक्ट्रीक वाहन वापरनाऱ्या मेट्रोचे प्रवासी व इतरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. या माध्यामाने एकीकडे पर्यवरण रक्षणाच्या मेट्रोच्या संकल्पनेला बळ मिळणार असतांना दुसरीकडे मेट्रोच्या लास्टमाईल कनेक्टीव्हीटी योजनेची अंबलबजावणी देखील सूचारू पद्धतीने होईल. या चार्जिंग पॉईंट वर लिथीयम निर्मित बॅटरी वाहन चार्ज केली जाईल.एक चार चाकी वाहनांला पूर्णपणे चार्ज व्हायला १ तासाचा कालावधी लागतो व ज्यामध्ये १४ युनिट उर्जा चार्ज होऊ शकेल व १२० कि.मी. पर्यत वाहन चालू शकेल.
यावेळी महा मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सोलर आणि स्टेशन) श्री. हिमांशू घटूवारी, उपमहाव्यवस्थापक (सोलर) श्री. नरेंद्र अहिर,उर्जा दक्षता सेवा विभागाचे साहाय्यक अभियंता श्री. कुणाल सोनी,जीजोबा पारधी,दीपांकर बागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.