Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै ०४, २०१९

गरजू मुलांना कपड्यांचे वाटप




 जागृत युवा मंच अहेरी / चंद्रपूर तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या वतीने आयोजन

चंद्रपूर - येथील रमाबाई नगर मधे 50 गरजू मुलांसाठी कपडे वाटप करण्यात आले. चंद्रपूर येथील रमाबाई नगरच्या झोपडपट्टी परिसरात अनेक कामगार लोक राहतात. या वस्तीत जीवनावश्यक वस्तू सोबतच मूलभूत गरजा व शिक्षणाचा अभाव आढळून येतो. येथील लहान गरजू मुलांपर्यंत जाऊन त्यांची मदत करताना जागृत युवा मंच तथा सर्वांगीण विकास शिक्षण प्रसारक मंडळच्या पदाधिकाऱ्यांना विशेष आनंद झाला. वस्तीतील पालकांनी या सामाजिक संघटनांचे आभार मानले आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका उराडे, राहूल पेंढारकर, प्रशांत रामटेके, राशी उराडे, राहूल रामटेके, किनारा खोब्रागडे, अंकित आदिनी, मयुरी आत्राम सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.