Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै ०४, २०१९

चंद्रपूर:वाघाच्या हल्यात महिला ठार

वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली
 वनपरिक्षेत्रातील जम्भारला येथील घटना 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४२४ अंतर्गत येत असलेल्या जाम्भारला गावातील जंगलात सरपण गोळकरण्याकरिता गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले आहे.शांता आनंदराव सोनुले असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास शांता सोनुले हि महिला गावाला लागून असलेल्या जंगलात सरपण गोळकरण्याकरिता गेली होती.मात्र त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला.

 त्याच परिसरात वनविभागाचे पथक गस्त करीत असताना तिचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले असून तपास सुरु केला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.