नागपूर / अरूण कराळे :
नागपूर तालुक्यातील लाव्हा ग्राम पंचायत अंतर्गत असणाऱ्या संतोषी नगर (महादेव नगर) येथे दारूच्या आहारी गेलेल्या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मृतक सूरज झनकलाल बेले वय १९ रा . संतोषी नगर महादेव नगर लाव्हा येथील निवासी याने मंगळवार ३० जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास कपडे सुकवायच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे .सूरज हा चिकन सेंटर मध्ये काम करायचा आणि बऱ्याच दिवसापासून तो दारूच्या आहारी गेला होता.मृतकाला एक भाऊ,तीन बहीण असून घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.मृतकाची आई बुधवार ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उठवायला गेली असता सूरज हा मृतावस्थेत आढळला.
फिर्यादी मृतकाचे वडील यांनी वाडी पोलीसांनी घटनेची माहिती दिली असता.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविला.पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख,हवालदार दिनेश तांदुळकर,शिपाई नंदकिशोर रडके करीत आहे.