विमाशि संघ
नागपूर / अरुण कराळे :
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने,शिक्षण विभागातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आंदोलनाव्दारे,अधिकारी स्तरावर तसेच प्रसार माध्यमाव्दारे मांडलेली आहे. भ्रष्टाचारास राजकिय व प्रशासकिय आश्रय मिळत असल्यामुळे चौकशित दोषी आढळुनही संबधिता विरूदध कारवाई न होता भ्रष्टाचार संरक्षित केला जात असल्याचा आरोप विमाशि संघाने केलेला आहे.
कनिष्ठ महाविदयालयातील शालार्थ आयडीची मार्च मध्ये शिक्षणसंचालक (माध्यमिक )यांनी नागपुर येथे सुनावणी घेवूनही निकाली काढण्यात आली आलेली नाही .नाशिक विभागातील प्रकरणांना शिक्षण आयुक्त स्तरावर मे २०१९ निकाली काढुन न्याय देण्यात आला.यशवंत शिक्षणसंस्था वर्धा येथील प्रकरणे माहे डिसेंबर २०१८/जानेवारी २०१९ मध्ये निकाली काढण्यात आली .तीन-तीन वर्ष नोकरी करूनही शिक्षकांना वेतन नाही.
नागपुरचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.शिवलिंग पटवे यांच्या नियमबाह्य प्रकराबाबत विभागिय सचिव परीक्षा मंडळ,नागपुरचे श्री रविकांत देशपांडे यांची चौकशी नेमण्यात आली .डाॅ.पटवे हे चौकशीत फाईल्स पुरवित नाही .
चौकशी अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार नोंदवुनही चौकशी सुरू असतांना साधे पञ डाॅ.पटवे यांना दिले नाही किंवा विचारणा केलेली नाही.चौकशी अधिकारी यांनी २० जुन २०१९ रोजी शिक्षण आयुक्त व ५ मे २०१९ रोजी शिक्षणसंचालक(माध्यमिक ) पुणे यांना पाठविली परंतु भ्रष्टाचार, प्रशासकिय व राजकिय संरक्षणामुळे फाईल्स मधे दडपले गेलेला आहे.वेतन पथक माध्यमिक व प्राथमिक यांनी ३१ मार्च मधे नागपुर कोषागाराने थकबाकीची पारीत केलेली देयके युनियन बॅकेत दोन महीने उशिराने पाठविली.
अनेक उदाहरणे संघटनेने शिक्षण उपसंचालक,यांना संघटनेच्या बैठकित अनेकदा व २७ जुन २०१९ रोजी प्रत्यक्षात तपासनित आणुन दिली .₹११ लक्ष ८ हजार ३९० रूपयाचे देयक शिक्षकाच्या खात्याऐवजी संस्थेच्या खात्यात जमा केली या भ्रष्टाचारात बॅक अधिकारीही असल्याचा पुरावा आहे.शिक्षण विभागाचे अधिकारी बॅकेला एनपीये कमी करण्यात सहकार्य करित आहे काय? सहा वर्षापेक्षा जास्त कालावधिचे ₹ ११लक्ष ७७हजार १८३ चे देयक शिक्षण सचिव यांचे मंजुरीत न पाठविता मंजुर करण्यात वेतन पथक अधिक्षकापासुन शिक्षण संचालका पर्यंत प्रशासकिय संरक्षणात मंजुर करण्यात आलेले आहे.
मनपा नागपुर येथील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे ४२ महिण्याच्या महागाई भत्याच्या थकबाकिची माहे सप्टेंबर २०१८ रोजी सादर केलेली देयके,वेतनातील थकबाकिची सांगुन शिक्षणसंचालक यांनी दुरूस्तीसाठी परत पाठविली,एकास एक न्याय तर दुसर्यास वेगळा हा शिक्षण विभागात भ्रष्टाचार सर्वञ पसरलेला असल्याचा आणखी एक पुरावा असल्याचे विमाशि संघाने म्हटलेले आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी या दोन महीण्याची माहे मार्च २०१९ मधे देय सातवे वेतन आयोगाची थकबाकी रक्कम वेतन पथक माध्यमिक जिल्हा भंडारा व चंद्रपुर यांनी दि.२९ जुन व वर्धा जिल्ह्याने दि.६ जुनला कोषागारात संघटनेच्या आंदोलनानंतर पाठविण्याचे मान्य केले.
नागपुर वेतन पथक प्राथमिक व माध्यमिक कार्यालयाने हा निधी इतर देयके पारित करून निधीच शिल्लक नसल्याचे म्हटलेले आहे.याची सहसंचालक लेखा व कोषागार विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी विमाशि संघाने केलेली आहे.श्री.शिवदास भालाधरे,सहाय्यक शिक्षक,गोंदिया यांची नियमानुसार चार महिण्याच्या देय वेतनाची रक्कम नाकारणार्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशस्तीपञ देवुन गौरव करणे चुकिचे आहे.
श्रीमती माया मुन (कांबळे ) कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षिका यांना चुकिच्या पदधतीने अतिरिक्त दाखवुन पार्ट टाईम केले दहा महीन्याचे वेतनच अदा केले नाही .भ्रष्टाचार उघडकीस येताच कमी केलेले पद पुर्णकालिन केले .
हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात दलाल कायम वास्तव्याचा पुरावा असल्याचे स्पष्ट होते. या भ्रष्टाचारा विरूदध विमाशि संघाने,शनिवार,दि.६ जुलै २०१९ ला दुपारी २ ते ५ या वेळात,शिक्षण उपसंचालक कार्यालय धंतोली नागपुर समोर धरणे/निर्दशने आंदोलन करण्याचे निश्चित केलेले आहे.या आंदोलनाची सुचना आयुक्त (शिक्षण) यांना पाठविलेली असल्याचे विमाशि संघाने एका पञव्दारे स्पष्ट केलेले आहे.
भ्रष्टाचारा विरूद्धच्या या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन विमाशि संघाचे सर्वश्री प्रमोद रेवतकर,विठ्ठल जुनघरे,तेजराज राजुरकर,अविनाश बडे,सौ.ज्योती मेश्राम,मनोज बागडे,ज्ञानेश्वर नागमोते,राकेश दुम्पलवार,मधुकर भोयर,विजय नंदनवार,मोहन सोमकुवर,ज्ञानेश्वर वाघ आदीनी केलेले आहे.