पोलिस ठाण्यात दाखल केला 420 चा गुन्हा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
कामगार विभागाकडून कामगारांना देण्यात येणा-या साहित्य वाटपात भ्रश्टाचार होत असल्याची तक्रार कामगारांनी यंग चांदा ब्रिगेडकडे केली. विषयाची गांर्भियता लक्षात घेता किशोर जोरगेवार यांनी तात्काळ साहित्य वाटपाचे काम सुरु असलेल्या सुशिल मंगल कार्यालय गाठून कामगारांकडून पैसे घेवून साहित्य देत असलेल्या कर्मचा-यांना रंगे हात पकडून त्यांना रामनगर पोलिसांच्या स्वाधिण केले.
पोलिसांनी या तिन कर्मचा-या विरोधात कलम 420 अंर्तगत गून्हा दाखल केला आहे. या साहित्य वाटप करणा-या कं़़त्राटदारावही कारवाही करण्यात यावी अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.
इमारत बांधकाम करणा-या कामगारांची सुरक्षा रक्षा घेता त्यांना कामगार विभागातर्फे सुरक्षेचे साहित्य वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्याच्या प्रक्रीयेत पारदर्शता नसल्याने सहित्य घेण्यासाठी आलेल्या कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामगारांना तिन दिवसांपासून तांत्काळत ठेवण्यात आले आहे. दरम्यान आज चंद्रपूरातील सूशिल मंगल कार्यालयात हे साहित्य वाटप करण्याचे काम सूरु होते. यासाठी चंद्रपूरसह वरोरा, जिवती, बल्लारशाह येथील कामगार मोठ्या संख्येने आले होते. मात्र साहित्यासाठी येथील कर्मचा-यांनी कामगारांना पैश्याची मागणी करण्यात आली.
यातील काही कामगारांनी पैसे दिले. मात्र काही कामगारांनी याची तक्रार यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्याकडे केली. किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांसह सुशिल मंगल कार्यालय गाठून पैसे घेऊन साहित्य वाटप करणा-या कर्मचा-यांना रंगे हात पकडले. यावेळी या कर्मचा-यांच्या बुकमध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. जोरगेवार यांनी या तीन कर्मचा-यांना सोबत घेवून रामनगर पोलिस ठाणा गाठला व या तीनही कर्मचा-यान विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या तिन्ही कर्मचा-यां विरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. कामगारांना वाटप करण्यात येत असलेल्या साहित्य वाटपात पारदर्शता आणा, तालुका लेवर वर हे साहित्य वाटप प्रक्रिया सुरु करा अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.
तसेच हे साहित्य वाटप करण्या-या कंत्राटरावही कारवाही करण्यात यावी अशी मागणी ही किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी, नगर सेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, हाजी सैयद, मुन्ना जोगी, तिरुपती कालेगुरवार, बबलू मेश्राम, विनोद अनंतवार, ईरफान शेख, विलास सोमलवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.