Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २९, २०१९

महावितरणकडून ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत

युद्धपातळीवर काम करीत २५० वीजखांब पुन्हा उभारले

वर्धा/प्रतिनिधी:



 वर्धा जिल्ह्याच्या ग्रामिण भागात काही दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे करीत ८ गावातील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला. 


  जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने वर्धा जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. परिणामी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने जामठा, धोत्रा, सालोड, नुरापूर, सास्ताबाद, सावली, कुरझेडा, तरोडा या ८ गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे वायफड वीज उपकेंद्र बंद पडले होते. महावितरणच्या वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि वर्धा ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी नियोजन करून सर्वात प्रथम वायफड वीज उपकेंद्रातील बिघाड दुरुस्त करून टप्याटप्याने संपुर्ण परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत केला.



त्यांच्या या नियोजनांतर्गत सर्वप्रथम परिसरातील घरगुती वीज ग्राहकांचा वीज पुरवठा अहोरात्र काम करीत तात्काळ सुरळीत केला. मात्र अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने नवीन खांब उपलब्ध होईस्तोवर शेतातील वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागणार होता. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आणि वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे तातडीने सिमेंटच्या २५० खांबाची उपलब्धता करून दिली. साहित्याची उपलब्धता झाल्यानंतर लगेचच काम सुरु करून ते त्वरीत पूर्ण होण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला व हे काम नियोजित वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना सर्व संबंधित कंत्राटदारांना देण्यात आल्या. विस्कळीत झालेली यंत्रणा पूर्वपदावर आणायचे कठोर आव्हान कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे यांनी स्वीकारून केवळ १५ दिवसातसर्व वीजखांब पुन्हा नव्याने उभे करीत परिस्थिती पूर्वपदावर आणून तेथील वीजपुरवठा सुरळीत केला.


 महावितरणकडून विहित कालावधीत शेतीपंपाचा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत केल्याने परिसरातील शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणी करतेवेळी दिलासा मिळाल्याने परिसरात शेतीच्या कामांना गती मिळाली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.