Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १४, २०१९

शेतात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

मौशी/प्रतीनिधी: 


घरात  अठराविश्व दारिद्र्य, आई दुर्धर व्याधीने त्रस्त बापही मेहनतमजुरीने खंगलेला एक मोठा भाऊ आणी आजी अशा परीवाराची स्वताच्या  खांद्यावर जबाबदारी  निर्भिडपणे  पेलवनारा २२ वर्षिय तरुन जेव्हा त्याची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकिस येते. तेव्हा संपुर्ण परिसर शोकसागरात बुडुन जातो.
सविस्तर वृत्त असे की, आज दीनांक ११/१०/२०१९ सकाळी ८:०० वाजता मु बेलगाव पो.सावरला येथील ध्यानेश  ईश्वर धोटे वय २२ असुन तोरगाव खुर्द परिसरात असलेल्या शेतात जावून शेतातील काट्या व ईतर मशागतपुर्व कामे करुन येतो असे आजीला सांगत तो शेतावर निघुन गेला. मात्र ९:०० वाजता दरम्यान ध्यानेश ची मौजा मौशी येथील मामी त्याच शेतावर गेल्यानंतर तीला ध्यानेश निंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे निदर्शनास  आले. सदर घटनेची माहीती तोरगाव खुर्द येथील पोलीस पाटील, बेलगाव येथील नातेवाईक यांना मिळताच अनेक लोकांची गर्दी झाली. स्थाणीक पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे माहीती दिली आणी पिएसआय सय्यद यांचे नेतृत्वात तपास पथक घटना स्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशी करीत असतांना धानेश  आठ दिवसाअगोदरच तेंदुपत्ता सिजनवरुन परतलेला होता. आईच्या दुर्धर व्याधीमुळे मनातुन खचलेला आणी त्या आजारावर लाखोचा खर्च होवुनही आपली आई बरी होत नाही मात्र औषध पाण्यासाठी अंगावर झालेले लाखोचे कर्ज ह्यामुळे तो चिंतातुर होता. 
मोठा भाऊ पहाटेच उठुन हमालीवर जातो. आता घराची भिस्त मात्र दोघावरच असुन रक्ताचं पाणी करुनही आपल्याला यश येत नाही. ह्या विवंचनेत असतांना धानेश ने ही टोकाची भुमिका घेत स्वताची जिवनयात्रा संपवली. या घटनेचा पुढिल तपास बिट ईन्चार्ज अ.पिसे करीत असुन मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.