युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.03 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे द्वारा पुरस्कृत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूर यांच्या विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता चंद्रपूर येथे मंगळवार दिनांक 21 मे 2019 रोजी एक दिवसीय उद्योजकता परिचय या निशुल्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध उद्योगासंबंधी मार्गदर्शन, उद्योगाची निवड, यशस्वी उद्योजकांचे अनुभवकथन, शासनाच्या व महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती, जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना व निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता नाव नोंदणी करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवकांनी समाज कल्याण सभागृह, समाज कल्याण कार्यालय, जलगर चंद्रपूर येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के.व्ही राठोड यांनी केले आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती व नोंदणी करिता दिनांक 21 मे 2019 पर्यंत 07172-274416 किंवा 9403078773 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर व तसेच कार्यक्रम समन्वयक स्मिता पेरके यांचे 9175229413 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.