Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

PMP bus मध्ये उजवी बाजु पुरुषांसाठी आरक्षित करा

 दत्ताञय फडतरे यांची पी.एम.पी प्रशासनाकडे मागणी


प्रतिनिधी (पुणे )

पी.एम.पी बसमध्ये पुरुषांना  उजवी बाजु  आरक्षित करण्याबाबत मागणी दत्ताञय फडतरे यांनी पी.एम,पी व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांकडे केली आहे

पुणे परिवहन महामंडळ पुणे , पिंपरी चिंचवड शहरांसह उपनगरांसह जिल्ह्याच्या निमशहरी व ग्रामीण भागात सेवा देत आहे .महिलांचा सन्मान व्हावा, प्रवासासाठी परवड थांबावी, त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी  पी.एम.पी .एम.एलच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत यामध्येच महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष  बस सुरु केल्या आहेत .सर्व प्रकारच्या बसमध्ये डावी बाजु  पुर्णपणे महिलांसाठी आरक्षित आहे. तर उजवी बाजु पुर्णपणे पुरुषांसाठी आरक्षित करायला काय हरकत आहे ?डाव्या बाजुला एखादा पुरुष बसला तर त्यावर महिला हक्काने त्या पुरुषाला त्या जागेवरुन उठवतात.पुरुष उठत नसेल तर वाहकाच्या मदतीने  उठविण्यास भाग पाडले जाते.

 भारतीय संस्कृतीचा आदर, ,महिलांचा सन्मान  ,सहकार्य, मदत, कर्तव्य  ह्या गोष्टी मान्य आहेत. बसमध्ये  पहिल्या स्टाँप पासुन   डावी  बाजु रिकामी असल्यास पुरुष त्याठिकाणी  बसला तरीदेखील  पुढच्या स्टाॅप ला महिला बसमध्ये आल्यानंतर त्या जागेवर हक्क सांगत पुरुषाला त्याजागेवरुन  उठवले जाते पुढचा प्रवास दहा किलोमीटरपेक्षा अधिक असला तरी तो धक्के खात , ताटकळत आणि उभे राहुनच करावा लागतो. दररोज  पी.एम.पीने प्रवास करणार्या पुरुषांना पी.एम.पीकडुन अपमानास्पद  वागणुक मिळत असल्याचे दिसुन येत आहे.

 दोन्ही महानगरपालिका हददीतील व   जिल्ह्यातील निमशहरी व  ग्रामीण भागातील हजारो पुरुष ,कामगारवर्ग ,विद्यार्थी दररोज जवळपास  पन्नास  किलोमीटर च्या पुढे पी.एम.पीने  प्रवास करत असतात.पुरुष वर्गदेखील कामधंदा,उद्योग ,व्यवसाय शिक्षणासाठी बाहेर पडत असतो तोदेखील प्रवाशी आहेच. पी.एम.पी प्रशासनाकडुन पुरुषांकडे दुर्लक्ष होत असल्याने  अनेकांच्या मनामध्ये पी.एम.पी.एम,एल विषयी अन्यायाची भावना निर्माण होत असल्याचे दिसुन येत आहे. ह्या बाबी पञात नमुद केल्या आहेत.

स्ञी -पुरुष समानता ,कायद्यासमोर समानता ह्या नियमानुसार डावी बाजु महिलांसाठी आरक्षित आहे तर  उजवी बाजु पुर्णपणे पुरुषांसाठी आरक्षित ठेवण्याबाबत पी.एम.पी.एम.एल ने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

सबंधित प्रकरणाबाबत प्रशासनाने  लवकरात लवकर  निर्णय घ्यावा बसमधील  उजवी बाजु पुर्णपणे पुरुषांसाठी आरक्षित करावी  अशी मागणी दत्ताञय फडतरे यांनी पी.एम.पी प्रशासनाकडे केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.