Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

शिवजयंती सोहळ्याच्या सभेवरुन वाद

जुन्नरला होणारी सभा ओझरला घेण्यास जुन्नर मधील सर्वपक्षीय पदाधिका-र्यांचा विरोध 


जुन्नर /आनंद कांबळे   

यंदाच्या वर्षी  शिवजयंती सोहळ्याची सभा ओझर येथे घेण्याचे नियोजन   लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.मात्र या निर्णयाला जुन्नर शहरातील  सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडुन विरोध होत आहे..शिवजयंतीची सभा किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी  नेहमीप्रमाणे जुन्नरलाच झाली पाहिजे ती ओझऱला घेऊन देणार नाही,असे निवेदन जुन्नर शहरातील  सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच शिवप्रेमीं जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.   


                                                                                    19 फेब्रुवारी रोजी किल्ले शिवनेरीवर साजरा होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यांनंतर  प्रतिवर्षी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला होणारी मुख्यमंत्री ,व मंत्रीगनांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्नर येथे  होणारी सभा यावर्षी अष्टविनायक क्षेत्र ओझर येथे  होणार  असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी  जुन्नर येथे झालेल्या शिवजयंती  नियोजन बैठकीत सांगितले होते.


किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळया नंतर    जुन्नरला होनाऱ्या सभेची परंपरा खंडीत करु नये असे निवेदन    जुन्नरचे शिवसेनेचे नगराध्यक्ष शाम पांडे,   उपनगराध्यक्ष अलका फुलपगार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते  दिनेश दुबे यांच्यासह सर्वच नगरसेवक ,नागरिकांच्या वतीने  निवेदन देण्यात आले आहे.

 जुन्नर शिवजन्मभूमी सोडून दुसऱ्या  ठिकाणी घेण्यासाठी  ओझरला येथे सभा घेण्याचा  निर्णय आम्हास मान्य नाही अन्यथा   आम्ही सभा  होऊ देणार नाही,असे निवेदनात म्हटले आहे.


ठळक बाबी

१)केंद्र शासनाच्या भारतमाता रस्ते जोडणी योजनेच्या अंतर्गत राज्यातील अष्टविनायक क्षेत्रांच्या 10 किमी परिघातील रस्ते दुपदरी करण्याची कामे सध्या सुरु आहेत त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमदार शरद सोनवणे यांचा प्रयत्न आहे. म्हणून अष्टविनायक क्षेत्र ओझर येथे सभा घेण्याचे नियोजन आहे. 


 २)जुन्नर येथेच  शिवजयंती सोहळ्यानंतरची सभा व्हावी म्हणून  पालकमंत्री गिरीष बापट यांना  पत्र जुन्नर  शहर भाजपच्या वतीने देण्यात आलेले आहे .नरेंद्र तांबोळी(अध्यक्ष-जुन्नर शहर भाजप)

३)महाराष्ट्र राज्याची निर्मिती  झाल्यापासून शिवजयंती ही शिवनेरीच्या पायथ्याशी होत आहे.यावर्षीच अपवाद का? असा प्रश्न जुन्नर शहरवासियांना पडला आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.