तहसीलदार प्रताप वाघमारे यांना पारधी समाजातर्फे विद्यार्थांनी दिला निरोप
कुही तालुक्यातून हिंगणा तालुक्यात तहसीलदार पदावर साहेबांची बदली झाली , हिंगणा तालुक्यातील शेषनगर हे संपुर्ण गाव पारधी समाजाचे असून साहेबांनी ' शासन आपल्या दारी'या योजनेअंतर्गत सर्वप्रथम शेषनगर या गावाची निवड केली , व उपविभागीय अधिकाऱ्यास सह सर्व संबंधीत खात्याचे अधिकाऱ्यासह पारधी समाजाच्या प्रश्न संबंधित तत्काळ बैठक बोलावण्यात आली .
इतिहासातील पारधी वस्तीवर पहिल्यांदाच शासन आपल्या दारी ही प्रथम बैठक होती .त्यानिमित्ताने सर्व अधिकारी सोबत गावातील नागरिकाच्या उपस्थितीत बैठक सम्पन्न झाली.
पारधी समाजाला स्वाभिमानाने जगावे व या समाजाचे जटिल प्रश्न कसे सोडवता येईल या उद्देशाने साहेबांनी शेषनगर या गावी सर्वप्रथम शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत गावातील जटील समस्याचे निराकरण केसे करता येईल या करीता संपुर्ण गावातील पारधी बांधवांना कार्यक्रमात आमंत्रित केले .
नविन तहसीलदार साहेब आपल्या गावी आले म्हणून अख्क गाव जमा झाले , यावेळी गावात सभा भरली , वेगवेगळ्या विभागातील शासकीय अधिकारी उपस्थितीत ही सभा सुरू झाली .
यावेळी गावातील नागरिकांनी जणू अनेक समस्यांचे पाऊस पाडले , अजब गजब सवाल जवाब केले , साहेब आम्ही अतिक्रमण शेती चे पट्टे मिळावेत , साहेब आम्हाला जातीचे दाखले ,विद्यार्थांना डोमेसिअल सर्टिफिकेट मिळावेत साहेब , आम्हाला राशनकार्ड, अश्या अनेक समस्याचा पाऊस पडला , असता साहेबांनी यावेळी समस्या संबंधित उपाययोजना विषयी मार्गदर्शन केले .
पारधी समाजाने शिक्षणाला महत्व देत ,पारधी समाजाने शिक्षणाकडे वळावे असे मार्गदर्शन करतांना या गावांमध्ये बेरोजगार पदवीधर झालेले मुलं साहेबांना दिसले , त्यामध्ये अनिल पवार यांनी गावाच्या समस्या मांडताना साहेबांचे लक्ष केंद्रीत केले व साहेबांनी विचारले तुझे शिक्षण कांय झाले , तर मी सांगते वेळी साहेब कला शाखेत पदवीधर झालो आहेत , मग साहेबांनी पुन्हां विचारले आता पुढे कांय , मग मी उत्तर दिलं साहेब M.A (मराठी ) करीत आहे .
साहेबांनी पुन्हां विचारले कशाला .M.A.मराठीत करीत आहेस , स्पर्धा परीक्षाची तयारी कर मग मी उत्तर दिलं साहेब मला मराठी शिकण्याकरीता मी M.A करीत आहे. मग पुन्हां साहेबांनी विचारले पुढे कांय , , मग मी साहेबांना म्हटलं मला समजलं नाही की पुढे कांय करायचे , अधिकारी कसे व्हायचे तर साहेबांनी माझा नंबर घे आणि मला ऑफीस ला येऊन भेट , असे म्हटले , मग मी एक दिवशी ऑफिस ला गेलो असता साहेबांनी मला गावातील जटील समस्या काय आहे ते विचारले , मग सहज उत्तर दिलं साहेब जातीचे दाखले , विद्यार्थांना पुढील शिक्षणाकरता जातीचे दाखले व डोमेसीअल सर्टिफिकेट हे शिक्षणाच्या आड येत असून जातीचे दाखले आवश्यक होते .
पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्याना जातीचे दाखले मिळावेत करीता साहेबांनी राजस्व उपविभागीय अधिकारी साहेबांचे मार्गदर्शन घेऊन पारधी समाजाकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे जातीचे दाखले देणे अशक्य होते .
मग कांय साहेबांनी एक फॉर्मेट तयार केले , 70वर्षावरील वयोवृद्ध पुरुष व पारधी समाज संघटना कडून पारधी असल्याचे प्रमाणपत्र , आधारकार्ड , असेल ते कागदोपत्री घेऊन साहेबांनी 250पेक्षा जास्त विद्यार्थी व गावातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावेत करीता मी आणि साहेबांनी पाठपुरावा करीत जातीचे दाखले करीता शिबिर घेतली असून 150हून जास्त विद्यार्थांना जातीचे दाखले व 13विद्यार्थांना डोमेशिअल सर्टिफिकेट वाटप केले.
मग एक दिवशी मी साहेबांच्या ऑफिस ला गेलो आणि साहेबांनी प्रश्न केला गावात किती पदवीधर आहे.मी म्हटलं साहेब 13विद्यार्थी आहे.मग साहेबांनी विचारले नागपुर जिल्हयात किती मुलं पदवीधर झाले आहेत.मी म्हटलं साहेब 25च्या वर आहे.साहेबांनी विचारले शासकीय नौकरीकरीता का प्रयत्न केले नाही .
साहेब आम्हाला कोणी मार्गदर्शन करीत नाही म्हणून आम्ही जसे मिळाले तसे शिक्षण घेत आहेत , मग साहेबांनी एक पदवीधर विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेण्यास ठरविले , साहेबांनी मला आदेश दिला अनिल सर्वाना कार्यशाळेत आमंत्रित करायला सांगितले , मी नागपुर जिल्ह्यातील सर्व पारधी समाजातील पदवीधर विद्यार्थांना हिंगणा येथे होत असलेल्या एक दिवसीय कार्यशाळेकरीता आमंत्रित केले ,
पारधी समाजातील विद्यार्थांना पुढे कोणते शिक्षण घ्यावे , आपण अधिकारी कसे बनू असे अनेक प्रश्न विद्यार्थांना पडत होते . साहेबांनी आठवड्यातच स्पर्धा परीक्षा संदर्भात एकदिवसीय स्पर्धा कार्यशाळा हिंगण्याचे नवनियुक्त तहसीलदार प्रताप वाघमारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शंभरहून जास्त विद्यार्थीनी आपली उपस्थितीती दर्शवली.
स्पर्धा परीक्षा संबंधित साहेबांनी मार्गदर्शन केले , सर्व विद्यार्थांना प्रथमच महित झाले की स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून आपण शासकीय अधिकारी होऊ शकतो , साहेबांनी सर्व विद्यार्थांना बुक , पेन , नोट्स , स्वखर्चाने वाटप केले .साहेबांनी पारधी समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षा कड़े वळावे असे मार्गदर्शन करीत विद्यार्थांना वेळोवेळी अडचण आल्यास साहेबांनी मार्गदर्शन केले .
या कार्यशाळा तुन शेषनगर या गावातील विद्यार्थिनी
सूर्पोचना क्रिष्णा भोसले या विद्यार्थिनी ने PSI करीता MPSC.ची पूर्व परीक्षा दिली व दोन वेळा पास केली . मुख्य परीक्षा करीता निवड झाली असून कागदोपत्री अभावी या विद्यार्थिनीला मुख्य परीक्षाला बसता आले नाही . असून या गावात तीन विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षा कड़े वळून वेगवेगळ्या पदांसाठी पूर्व परीक्षा पास केली आहेत .
गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कड़े वळून शासकीय अधिकारी होण्यास सर्वोतोपरी मेहनत घेत आहेत .व एक दिवशी यश प्राप्त होईल अश्या अपेक्षांनी अभ्यास करीत आहे. साहेबांच्या मार्गदर्शन खाली मुले जिद्दीने अभ्यास करीत आहे. साहेबांना आम्ही अधिकारी बनून गुरुदक्षिणा देऊ असं संकल्प विद्यार्थांनी केला आहे.
साहेब हिंगणा तालुक्यात दोन वर्ष तहसीलदार म्हणून कार्यरत होते यासंदर्भात साहेबांनी पारधी समजातील भूमिहीन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेली घरकुल व शेत जमीनीचे पट्टे वाटप केले .
सर्व विद्यार्थांना जातीचे दाखले व पदवीधर विद्यार्थांना डोमेसीअल सर्टिफिकेट एका दिवसामध्ये 13विद्यार्थांना देणारे असे कर्तव्यदक्ष अधिकारी मा .तहसिलदार प्रताप वाघमारे साहेब यांनी पारधी समाजाच्या विकासाकरिता अवघ्या दोन वर्षात केलेल्या कार्य हे कौतुकास्पद आहे.साहेबांची बदली झाल्याचे समजताच सर्व विद्यार्थांचे डोळे पाणावले व ऑफीस ला भेटीसाठी गेले असता साहेब विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर येथे बदली होऊन गेले. साहेबांना भेटता आले नाही म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.