Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

आलेसुर येथे शिवसेनेची शाखा

गाव तिथे शाखा करणार:संजय अनासाने 
नागपूर / अरूण कराळे:

नागपूर तालुक्यातील आलेसूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेनेच्या शाखेचे फलक अनावरन करण्यात आले .नागपुर तालुकाप्रमुख संजय अनासाने यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले .कार्यक्रममाला प्रमुख पाहूणे म्हणून वाडी शहर प्रमुख प्रा.मधुभाऊ माणके-पाटिल ,उपशहर प्रमुख मदनसिंग राणा , विभागप्रमुख नरेश मसराम , उपविभागप्रमुख कैलास मालवे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष व महाराजांच्या प्रतीमेचे पूजन करुन हारार्पण करण्यात आले.गाव तिथे शाखा या संकल्पनेतून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा तयार करण्याचा मानस यावेळी तालुका प्रमुख संजय अनासाने यांनी बोलुन दाखविला . नवनियुक्त शाखाप्रमुख रुपरावजी राऊत ,उपशाखाप्रमुख मंगेश शेंडे, शाखा पदाधीकारी घनशाम सोनुले ,प्रविण म्हस्के, अमर म्हस्के यांचे प्रा . मधुभाऊ माणके-पाटिल यांनी पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन केले. 

या कार्यक्रमाला सुरज टेकाडे,राकेश अंगुरे, राहूल भडंग ,संदिप टेकाडे ,प्रशांत राऊत ,मंगेश राऊत ,सतीश नेवारे ,गोपाल वागाडे ,कमलेश सोनुले व अनेक शिवसैनीक उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.