चिमूर तालुक्यात दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई
चिमूर/ रोहित रामटेके:
चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी होऊन ३ वर्षे झाली पण जिल्हात दारूचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत सुरु आहे परंतु या अवैध धंदयांना आडा घालण्यासाठी जिल्हातील पोलिस कर्मचारी तत्पर झाले आहेत कारण जिल्हात रोज कुठे ना कुठे अवैध दारू पकडतात.
येत आहे तशीच अवैध दारू चिमूर पोलीस ठाण्यात दि.२०/०७/२०१६ ला सहाय्यक पोलिस अधिकारी सुधाकर माकोडे यांच्या सह तपासी अधिकारी सोरते यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी गोकुलदास गेजीक मु. अमरपुरी भान्सुली यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरी मुद्देमुल माल २८८ नग देशी दारू साठा जप्त करण्यात आले होते. यामध्ये आरोपी गोकुलदास विश्वनाथ गेजीक वय ४० वर्षे राहणार अमरपुरी भांन्सुली, लालीतसिंग बावरी वय २५ वर्षे राहणार पवनी असे दोन आरोपी विरुद्ध अ.प.२३०/२०१६ कलम ६५ ई ८३ मदाका पोलीस स्टेशन चिमुर ला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दि.०५/०२/२०१९ ला पैरावी अधिकारी सुधाकर बुटके यांच्या सह सहाय्यक पो.अभियोक्ता संजय आर. ठावरी यांनी आरोपी गेजीक विरुद्ध गुन्हा सिद्ध करून चिमूर कोर्ट च्या माध्यमातून मा.श्री.छल्लानी सा. जे. एम.एफ.सी.कोर्ट यांनी आरोपी गेजीक ला दोषी धरून २५०००/- रु दंड व ३ वर्ष सक्षम कारावास व दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा व लालीतसिंग याला निर्दोष असा निर्णय देण्यात आला.