चंद्रपूर/प्रतिनिधी:
स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) चंद्रपूर शिकणाऱ्या आदिवासी प्रवर्गातील येथील आदिवासी मुलींच्या वसती गृहातील पाणीपुरवठा मागील १५ दिवसापासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पाण्याकरिता इतरस्त्र भटकावे लागत आहे.त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आयटीआय मधील वसतिगृहात या समस्येबाबत अनेकदा आयटीआयचे प्राचार्य यांना मौखिक व लेखी तक्रार करून माहिती देण्यात आली.
परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या कायम असून विद्यार्थ्यांनी मुलांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे मुलींच्या वसतिगृहांची जबाबदारी ज्या वसतिगृह पालाकडे आहेत त्या मागील तीन दिवसांपासून बाहेरगावी गेल्याने प्रशिक्षणार्थी कडून सांगण्यात येत आहे.