Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २०, २०१८

वह्या पुस्तकांच्या रुपाने जपल्या वडीलांच्या स्मृती

  • निमगाव भोगीतील कोठावळे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
  • प्रथम पुण्यस्मणानिमित्त अवाजवी खर्च टाळुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
निमगाव भोगी (ता.शिरुर ) येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोठावळे , सरपंच सुमन जाधव, अंकुश इचके मुख्याध्यापक फक्कड थोरात , विद्यार्थी व मान्यवर 

अण्णापूर (वार्ताहर ) आपल्या सर्वांच्या जीवनात आईवडीलांचं स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरणारी आहे. मात्र अलिकडच्या काळात हे प्रसंगही मोठे इव्हेंट म्हणुन साजरे केले जातात. फ्लेक्सबाजी , जाहिराती भोजनाच्या मोठमोठया पंगती उठविल्या जातात. मात्र हा अवाजवी खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत वडीलांच्या स्मृती वेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न निमगाव भोगी (ता.शिरुर) येथील कोठावळे परिवाराकडुन झाला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश प्रेमराज कोठावळे यांनी आपल्या वडीलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वरील सर्व खर्च टाळत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या भगिनी मंगल व लता तसेच घरचे सर्व नातेवाईक यांनी पाठींबा देत या निर्णयाचे स्वागत केले.
त्यानंतर अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वह्या तसेच ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करुन देत सर्वांना खाऊचेही वाटप केले. गणेश कोठावळे व त्यांच्या भगिनी आणि नातेवाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत वह्या पुस्तकांच्या रुपाने वडीलांच्या स्मृती जपत समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी निमगाव भोगीच्या सरपंच सुनंदाताई जाधव, उपसरपंच सुनंदाताई पावशे, माजी सरपंच अंकुश इचके, सबाजी सांबारे, लक्ष्मण सांबारे ,विकास सोसायटीचे चेअरमन उत्तम व्यवहारे, ग्रामपंचायत समितीचे सदस्य दिपक राऊत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास इचके , उपाध्यक्ष बाळासाहेब राऊत,ज्ञानेश्वर रासकर, निमगाव भोगी गावचे शिवसेना अध्यक्ष सुरेश फलके, प्रदिप राऊत, शाळेचे मुख्याध्यापक फक्कड थोरात , मालन गायकवाड , मिना थोरात , मंगल तळोले, यांच्यासह अनेक ग्रामस्थ तसेच गणेश कोठावळे यांचे मित्र परिवार उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अंकुश इचके , सुत्रसंचालन मुख्याध्यापक फक्कड थोरात यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कोठावळे यांनी मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.