Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १५, २०१८

चंद्रपूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे छात्र नेता संमेलन संपन्न

छात्रशक्ती ही बलाढय राष्ट्रनिर्मीतीची महाशक्ती बनण्यासाठी अभाविपचा प्रत्येक सदस्य कार्यरत - श्री. निलेष शिंदे, प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार
चंद्रपूर/प्रतिनिधी:-

छात्रशक्ती ही महाशक्ती असून बलाढय राष्ट्रनिर्मीतीची संकल्पना विद्याथ्र्यांच्या एकीकरणातूनच घडेल यात दुमत नसून अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेचा प्रत्येक सदस्य देश सेवेच्या संस्काराचे बीज आत्मसात करून कार्य करित असतो याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो असे प्रतिपादन प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार श्री. निलेश  शिंदे यांनी स्थानिक कन्यका परमेष्वरी सभागृह येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिशद, चंद्रपूर तर्फे आयोजित छात्र नेता संमेलनाच्या माध्यमातून केले.
सदर छात्र संमेलनाच्या मंचावर प्रो कबड्डी मधील बंगाल वारीयर्स संघाचे कर्णधार श्री. निलेश शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्रमुख वक्ते म्हणून अभाविप प्रांत संघटन मंत्री शैलेन्द्राजी  दळवी, रवी दांडगे, आकाश  पोकल मुंडे, रघुविर अहीर, योगेश येनारकर , स्नेहीत लांजेवार यांची उपस्थिती होती. 
आपल्या संबोधनातून निलेष षिंदे यांनी पुढे सांगीतले की, आज विद्याथ्र्यांच्या अनेक समस्यांचे निवारण अभाविप तर्फे होत असून विद्याथ्र्यांची षैक्षणीक वाटचाल सुकर करण्याचे श्रेश्ठ कार्य अभाविप चा प्रत्येक सदस्य जबाबदारीने पार पाडत आहे. ज्ञान, षिल व एकता या त्रिसूत्रीवर अभाविपचे संपूर्ण कार्य होत आहे याचाही गर्व यावेळी निलेष शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ हा व्यक्तीच्या जिवनाचा भाग असल्यास जिद्द व चिकाटी निर्माण होत असते म्हणूनच विद्याथ्र्यांनी खेळाला सुध्दा वाव दयायला हवा. कबड्डी हा खेळ देशात पुर्वीपासून खेळला जात असून एकाग्रता हा या खेळातील प्रभावी वैषीश्टय असल्याचे सांगीतले. तसेच प्रो कबड्डीमुळे क्रीडा क्षेत्रात खेळांडूंना चांगला वाव आलेला असून कबड्डीचे अच्छे दिन आलेले आहे. 
शैश्निक अभ्यासक्रमासोबतचा खेळांचीही आवड जपणे अत्यंत आवष्यक असल्याचे यावेळी प्रस्ताविक भाशणातून ते म्हणाले. 
या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यषस्वीततेसाठी जिल्हा संयोजक शुभम दयालवार, विभाग संघटन मंत्री सौरभ कावळे, जिल्हा संघटन मंत्री तेजस मोहतूरे, माजी नगर मंत्री प्रज्वल गर्गेलवार यांनी परिश्रम घेतले. प्रसंगी श्री. निलेश शिंदे यांच्या हस्ते मिथून या मराठी चित्रपटाला संगीतबध्द करणाऱ्या अक्षय वालके व स्वप्निल वालके या भावंडांचा तर खेलो इंडिया खेलो या मध्ये सक्रीय सहभाग घेणाऱ्या वैभव मेश्राम यांचा सन्मान करण्यात आला. 
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभाविप चे विदर्भ प्रांत संघटन मंत्री रघुवीर अहीर यांनी चंद्रपूर महानगरातील विविध महाविद्यालयातील अभाविप कार्यकारीणी घोशीत केली. यात नगर अध्यक्ष योगेश येनारकर, नगर मंत्री स्नेहीत लांजेवार, सहमंत्री गौरव होकम, सहमंत्री यश बांगडे, महाविद्यालय प्रमुख आकाश लुक्कावार, विद्यार्थिनी प्रमुख एकता खेडकर, विद्यार्थिनी सहप्रमुख स्नेहल देशमुख, एसएफडी व एसएफएस प्रमुख मनिश पिपरे, कार्यालय प्रमुख कुर्श्ना पिपरे, क्रिडा प्रमुख प्रतिक काकडे, जनजाती प्रमुख अंकीत कोडवते, कनिश्ठ महाविद्यालय प्रमुख साकेत सोनकुसरे, टिएसव्हीपी प्रमुख शुभम मुद्दावार, सोशल मिडीया/प्रसिध्दी प्रमुख प्रमुख प्रविण गिलबीले, नगर कार्यकारीणी सदस्य सुरज रागीट यांचा समावेश आहे. 
.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.