Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८

देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपले:सुधीर मुनगंटीवार

अटलजींचे आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
भारतरत्‍न श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाने देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. आज एक युगपुरूष काळाच्‍या पडद्याआड गेला असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. 
 भारतरत्‍न श्रध्‍देय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाने देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. आज एक युगपुरूष काळाच्‍या पडद्याआड गेला असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.
           1989 च्‍या लोकसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्‍यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवार होतो. अटलजींनी त्‍यावेळी आपल्‍या भाषणात म्‍हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशिर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा आहे. माझ्या समाजिक आणि राजकीय प्रवासात त्‍यांचे हे कौतुकोदगार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले. एक अजातशत्रु नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता पंतप्रधान असे बहुआयामी व्‍यक्‍तीमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे. तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात , समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला पण तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.