Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १७, २०१८

बोरिंग खोदणारा ट्रक पलटला;९ मजूर गंभीर जखमी

कारंजा(घा.)/प्रतिनिधी:
कारंजा मार्गे मध्यप्रदेश जाणारा बोरिंग खोदणाऱ्या ट्रकचा रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास 
कारंजा - भरसिंगी रोडवर तरोडा या गावाजवळ चक्रीघाटावर ट्रक फेल झाल्याने पलटला व अपघात झाला.
ट्रक क्र. TN 28 AE 6688 हा ट्रक मध्यप्रदेशकडे जात असतांना चक्रीघाटावर ब्रेक फेला व ट्रक पलटला या ट्रकमध्ये ५ बोरिंग खोदकाम करणारे कर्मचारी होते, त्या संपूर्ण कर्मचार्यांना गंभीर दुखापत झाली, या सर्व जखमींना कारंजा हॉस्पिटलमध्ये उपचारा करिता आनण्यात आले.मात्र त्यातील ४ जण गम्भीर जखमी असल्याने 
त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. यात दंनचल चंदर वय २०,लक्ष्मीपुत्र बिलासदास वय २०,नावरेवसिंग वय ३०, माधव वय ४०. यांचा समावेश आहे.तर जखमीनमध्ये  रुखदार घोर वय ३२,शोभा लकी वय १९,टिनात लकी जानी वय १८,तुळशीराम जानी वय २९,रघू उज्जरे वय १९, यांचा समावेश आहे.                      हे सर्व जखमी मजूर ओडिशा राज्यातील असल्याची माहिती आहे. चक्रीघाटावर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रक मागे येऊ लागला आणि हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.








SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.