Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०९, २०१८

पोलीस कल्याण सप्ताह २०१८ चे समारोप

चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिनांक ०१  जुन २०१८ ते ०८  जुन २०१८  रोजी पर्यंत सतत ८  दिवस  राबविण्यात आलेल्या पोलीस कल्याण सप्ताहाचे दिनांक ८  जुन २०१८ रोजी  पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे समारोप कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.  सदर सप्ताहदरम्यान महिला आणि पुरूश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी  यांचे करीता पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजना, आणि नवनविन उपक्रमाच्या माहिती पुस्तीकेच्या प्रती, तसेच पोलीस कल्याण योजनामार्फत विविध अनुदानाची माहितीची फलके, वाटप करण्यात आले असुन महिती सुचक बॅनर्स लावण्यात आले. सदर सप्ताहात दररोज योग शिबीर, व्यक्तीमत्व विकास, व्यसन मुक्ती, मणी सेवींग्स, फिटनेस फंडा, रूग्णालय आणि डॉक्टर्स याबाबतची माहिती, वाहतुक नियमन इत्यादी माहिती पोलीसांना देण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या समारोप समारंभ पोलीस मुख्यालय डिंल शेड येथे पार  पडला असुन कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नियति ठाकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पार पाडला असुन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस उपअधीक्षक(गृह) चंद्रपुर, श्री. मारोती इंगवले,श्री. अशोक कोळी, पोलीस निरिक्षक, मानव संसाधन विकास चंद्रपूर आणि विविध पोलीस स्टेशन, शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.