शंकरपुर पासून ४ किमी अंतरावर देशी दारूने भरलेल्या पिकप ट्रक गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पलटला. शंकरपूर-चिमूर रोडवर टाकळी गावच्या समोर हि घटना घडली.ट्रक पलटी होताच चालक व साथीदार घटना स्थळावरून फरार झाले.मिनी ट्रक क्रमांक MH 40 Y 8140 या ट्रकमधून वाहतूक करत होता. जिल्ह्यात दारूबंदी असतांना जिल्ह्याच्या हदीतून हि दारूची वाहतूक होत होती.चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटली असे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघात झालेली गाडी ताब्यात घेतली असता गाडीत सरकीच्या खाली २० हजाराची दारू व वाहनांची किंमत ५ लाख रुपये असे एकूण ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,पोलीस घटना स्थळ गाठत परियंत नागरिकांनी बरीच दारू लंपास केली होती. या घटनेंत चालक व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र जिल्ह्यात दारू बंदी असतांना दारू येतेच कशी चर्चा देखील घटनास्थळी बोलल्या जात होती.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शुक्रवार, जून १५, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments