Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ३०, २०१८

चंद्रपूरच्या खोज अर्थात शोध नाविन्याच्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

अभिनव आयडिया देणाऱ्या स्पर्धकांना सादरीकरणासाठी बोलावणार

चंद्रपूर/प्रातिनिधी:
खोज या स्पर्धेला जिल्ह्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आता या स्पर्धेतील पहिल्या पाच अभिनव प्रवेशिका पाठवणाऱ्या स्पर्धकांना आपला प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच आमंत्रित केले जाणार आहे. महाराष्ट्रात एखाद्या जिल्हा प्रशासनाने आपल्या कामकाजात नाविन्य आणण्यासाठी थेट जनतेतून आयडिया मागण्याची ही पहिलीच वेळ होती. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाला भक्कम प्रतिसाद मिळाला असून आता या आयडिया प्रशासनात आणण्याबाबत आखणी केली जाणार आहे.
एप्रिल महिन्यात खोज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने एक प्रसिद्धी मोहीम आखली होती. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील व देशातील अन्य भागातूनही चार गटांमध्ये प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाच्या या पुढाकाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी अतिशय कल्पक अशा आयडिया मांडल्या आहेत. यामध्ये राज्याबाहेरील अनेकांचा समावेश आहे. ही स्पर्धा चार भागात घेण्यात आली. यामध्ये कृषी, पर्यटन, प्रशासन व मानव जीवन विकास या चार गटांचा समावेश होता. मानव जीवन विकास घटकात चंद्रपूर जिल्ह्यातील डॉ बालमुकुंद पालीवाल यांच्या चमूने कल्पना पाठविली आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील प्रकृती महिला विकास केंद्र यांच्या चमूने भारती विनायकराव रामटेके यांच्या नेतृत्वात सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्याची कल्पना पाठविली आहे. 
बल्लारपूर येथील प्रवीण प्रदीप निखारे याचीही कल्पना पहिल्या पाच मध्ये आली असून त्यांनी कुक्कुटपालनाच्या संदर्भातील अभिनव कल्पना सुचवली आहे. अहमदाबाद गुजरात येथून अलजुबेर सय्यद यांनी गरिबांना शक्य होईल अशाच सोलर कुकरची कल्पना सुचवली आहे. सामान्यांच्या आयुष्यात आर्थिक उत्थान आणण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा अंबुजा सिमेंट फाउंडेशननेही आपले कर्तव्य बजावले असून प-हाटी (कापूस) पासून इंधन निर्मितीचा प्रस्ताव सुचविला आहे. या सर्व कल्पना संबंधित संस्था आणि व्यक्तींनी प्रत्यक्षात अंमलात आणल्या असून त्यांना याचा चांगला फायदा झाला आहे. याशिवाय याच गटांमध्ये ज्यांनी केवळ अभिनव आयडिया सुचविल्या आहेत. त्यामध्ये नागभीडचे उमाजी खोब्रागडे, चंद्रपूरच्या सुचिता संतोष जीरकुटवार, प्रवीण कुमार चादर, अभिषेक गादिया यांचा समावेश आहे. वेगवस मंजुषा या नागपूरच्या ग्रुपने देखील आपली कल्पना पाठविली आहे. पर्यटन विभागातील प्रत्यक्ष अंमलबजावणी न झालेल्या अभिनव सूचना देणाऱ्यांमध्ये योगेश्वर यशवंतराव दुधपचारे, प्रियंका इन्‍द्रपाल भालवे, चिमूर तालुक्यातील मुग्धायी मंडळाचे गोवर्धन नन्नावरे, सुरेश गायकवाड, रामराव नन्नावरे, सदानंद ढोक आदींनी आपल्या कल्पना सुचवले आहेत. याशिवाय राजुरा येथील आशिष चांदेकर, चंद्रपूर येथील राजेंद्र सिंग हरिसिंग गौतम, वरोरा येथील नितीन नारायणराव बारेकर, चंद्रपूर येथील प्रवीण कावेरी, भद्रावती येथील रवींद्र रत्नपारखी, वरोरा येथील पियुष कांबडी, चंद्रपूर येथील नीरज तन्नीरवार यांचा समावेश आहे.
कृषी क्षेत्रात ज्यांनी आपल्या कल्पना स्वतः राबवून नवे प्रयोग केले आहेत. अशामध्ये चारगांवचे मधुकर चिंधुजी भलमे, सावली येथील सविता गड्डमवार, वरोरा येथील विठ्ठल हटवार, राजूरा येथील सुहास आसेकर यांच्या नेतृत्वातील चमने कृषी पर्यटनाचा प्रस्ताव दिला आहे. सिंदेवाहीच्या दादाजी जोगू भेंडाळे यांच्या चमूने कृषी गटाचा पर्याय सुचविला आहे. नाशिक जिल्हयातील श्रध्दा बागवे यांनी मृद चाचणीचा पर्याय दिला आहे. चंद्रपूरचे हबीब मेहबुब शेख यांनी आर्थिक सबलतेचा पर्याय सूचविला आहे. तर मुलचे काशिनाथ बोरकर यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय सुचविला आहे. विशेष म्हणजे या पर्यायाची अंमलबजावणी झाली आहे. मारुती बाबाराव डोंगे, पुनम कपीलदास बाम्बोळे, मारुती नारायण मदनेलवार, प्रशांत विजय तावडे, विजय देविदास मेश्राम, विलास लक्ष्मणराव मालधारी, बिपिन सुरेश मुध्दा यांचा समावेश आहे. 
प्रशासकीय सुधारणा संदर्भात विवेक मोरेश्वर गरफाडे, रुपेश विनोद दुबे यांच्या नेतृत्वातील विनोद विठ्ठलराव कडुकर, सतीश हरिदास भोयर, सारंग उमाटे यांनी आपल्या कल्पना सुचवल्या आहेत. याशिवाय अक्षय कुमार पुरुषोत्तम गांधी, नम्रता देशमुख, डॉ भाईदास ढोले यांनी देखील आपल्या कल्पना सूचवल्या आहे, या कल्पनाचे लवकरच सादरीकरण एका कार्यक्रमात केले जाणार आहे. याबाबत स्पर्धकांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष सादरीकरण बघितल्यानंतर या कल्पनांचा प्रशासनामध्ये अंमल करण्यावर विचार केला जाणार आहे. शासनाच्या विविध योजना राबवताना त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात व त्यातून जनकल्याण साधले जावे हा उद्देश ठेवून ही योजना आखण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा पहिला अभिनव प्रयोग असून राज्यभर या प्रयोगाची चर्चा झाली होती.
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी
 घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.