Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी २३, २०१८

दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूर- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पुन्हा एकदा वाघाचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभाग खडबडून जागे झाले आहे. 
चारगाव बीटा पासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी चालू केली.
सखोल चौकशी अंती या वाघाचा मृत्यू हा दोन वाघाच्या झुंझीत झाला असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे  .  मृत वाघाचे वय हे अंदाजे वय ६-७  वर्षे असून हा नर वाघ आहे .वनविभागाची झोप उडविणाऱ्या  जय वाघाचा मुलगा "बिट्टू" या परिसरात फिरत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने दिली. दुसऱ्या मृत वाघाची या परिसरात अद्याप नोंद नसल्याची माहिती ही वनविभागाच्या सूत्राने दिली. त्यामुळे या वाघाचा मृत्यू हा दोन वाघाच्या झुंजीत झाल्याचे सांगितले जात आहे . 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.