Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १९, २०१७

उपराजधानीत तीहेरी हत्याकांड

नागपूर - मंगळवारी पहाटे गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना सिनेस्टाईल कारने उडवून दिले. अपघात घडवूनही ते जिवंतच असल्याचे लक्षात आल्याने कारमधील गुंडांनी लोखंडी रॉड काढून तिघांच्याही डोक्यावर जोरदार फटके मारले. त्यामुळेतिघांचा मृत्यू झाला.
भुऱ्या उर्फ संजय कदोई बनोदे (वय ४०, रा. पांढराबोडी), बादल संजय शंभरकर (वय २६, रा. कुंजीपेठ) अशी मृतांची नावे आहेत. तर, राजेश हनुमंत यादव (वय ४५, रा. बाजारगाव) असे गंभीर जखमी असलेल्याचे नाव आहे.
संजय बनोदे हा खतरनाक गुंड होता. दोन वर्षांपुर्वीपर्यंत तो पांढराबोडीतील खतरनाक गुंड भुऱ्या उर्फ सेवक मसरामचा साथीदार म्हणून ओळखला जायचा. अलिकडे या दोघांमधून विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले होते. या पार्श्वभूमीवर, संजय त्याचा गुंड साथीदार बादल शंभरकर आणि राजेश यादव यांच्यासोबत स्प्लेंडरवर बसून खरबी चौकातून मंगळवारी पहाटे पारडीकडे जात होता. त्याच्या मागावर असलेले गुंड स्वीफ्ट कार (एमएच ४०/ एआर ५७२२)मधून त्यांचा पाठलाग करीत होते. खरबी चौकातून १०० मिटर अंतरावर लक्ष्मी भोजनालयाजवळ आरोपींनी भुऱ्याच्या स्प्लेंडरला जोरदार धडक मारली. त्यामुळे ते भुऱ्या, बादल आणि राजेश तिघेही खाली पडले. त्यांना फारसा मार लागला नसल्याने ते उठून उभे झाले. ते पाहून कारमधून चार गुंड उतरले. त्यातील दोघांनी लोखंडी रॉडने भुऱ्या आणि त्याच्या साथीदारांवर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर फटके पडल्याने तिघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. त्यानंतर आरोपी दुसऱ्या वाहनाने पळून गेले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.