Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १७, २०१७

धामणा येथील शाळेजवळील रोहित्र (डिपी) हटणार तरी कधी।।

शाळेतील विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या जिवास धोका,  प्राथमिक शाळेजवळच दहा फुट अंतराने (डिपी) 
 ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना लेखी तक्रार ,अभियंता यांना अनेकदा लेखी तक्रार 

कोंढाळी प्रतिनिधी गजेंद्र डोंगरे :
येथून जवळच असलेले अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर धामणा(लिंगा) येथे गावच्या  मुख्यमार्गावर उच्च प्राथमिक शाळा परिसराला लागून अवघ्या दहा फुट अंतराने असलेले रोहित्र उच्च दाबाचे ट्रांन्सफार्मर (डिपी) सूमारे दहा ते बारा वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील मोतीराम सरोदे यांच्या घराला लागूनच ऊघडे दार असलेले रोहित्र (डिपी) जिवास धोकादायक होऊ शकतो.ग्रामपंचायत सरपंचासह अनेकदा मासीक ठरावात घेऊन रोहित्र (विद्युत डिपी) हटविण्यासाठी अनेकदा अभियंत्यास लेखी तक्रारी देखील  दिल्या.

या परिसरात असलेले रोहित्र उच्च दाबाचे ट्रांन्सफार्मर (डिपी) नेहमीच विद्युत स्पार्किंग होत असल्याने त्यामधील विस्तव (अग्नी) खाली पडतो व धूर निघत असतो. शाळेच्या मधल्या सुट्टीत विद्यार्थी खेळण्यास निघतो त्यामुळे एकादा मोठा अपघात टाळता येणार नाही. विद्यार्थ्यांनमध्ये व ग्रामस्थांच्या मनात भितीचे वातावरण झाले आहे.

     ग्रामपंचायत ठराव तक्रार (दि.२०/नोव्हेंबर/२०१५) उच्च प्राथमिक शाळा येथील मुख्यध्यापिका यांची तक्रार(दि.६/नोव्हेंबर/२०१५) व ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थांनाच्या  पदाधिकाऱ्यांची तक्रार(दि.२१/नोव्हेंबर/२०१५)रोजी लेखी तक्रारी ऊर्जामंत्री/पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळेसह कनिष्ठ अभियंता विज वितरण कंपनी बाजारगाव,सहायक अभियंता सिवील लाईन नागपुर,मुख्यअभियंता काटोल यांना लेखी तक्रारी देऊन सुध्दा महाराष्ट्रराज्य विद्युत विभागाची  रोहित्र (डिपी) हटविण्यास आली नसून विद्यार्थांच्या व ग्रामस्थांच्या जिवासी खेळ माडलाय.एकाद्या  मोठा अपघाताची जनू विज वितरण विभाग वाट पाहत आहे.  असे दिसून येत आहे असे दिसतयं.
      ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना पाच महिण्याअगोदर त्यांच्या जनता दरबारात निवेदन लेखी तक्रारी देऊन सुध्दा हे रोहित्र(डिपी) हटविण्यास असमर्थ दिसून येत आहे. ह्या मुख्यमार्गावर शाळेतील विद्यार्थी गावातील नागरिकांची दिवस-रात्रीच्या वेळेस मंदिरात येणारी भक्तगण यांच्या जिवास धोका असून रोहित्र(डिपी) ताबडतोब हटवून वा स्थानांतरण करुन ग्रामस्थांना व विद्यार्थांना जेनेकरुन मोकळेपणाचा स्वास घेता येईल. याची दखल शासणानी त्वरीत घ्यावी अशी  मागणी शाळेतील विद्यार्थी,मुख्यध्यापिका,सरपंचासह अन्य ग्रामस्थांप्रती जोर धरु लागली.अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.