Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर ०४, २०१७

भीषण अपघातात १२ प्रवासी गंभीर जखमी

पोंभुर्णा/प्रतिनिधी:
सोमवारीं चंद्र्पुर जिल्ह्यातील पोंभुर्णा जवळील पोंभुर्णा चक येथे  ट्रक आणि बस यात भीषण अपघात झाला या  अपघातात बस मधील तब्बल १३ प्रवासी  गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३०  वाजताच्या सुमारास पोम्भूर्णा चक फाट्याजवळ घडली .या अपघातात बसचा संपूर्ण समोरचा भाग चकणाचुर झाला होता. 

सोमवारी दुपारी १. वाजताच्या सुमारास बस क्रमांक MH ३४.A . १४८८ या  क्रमांकाची बस पोंभुर्णा कडून मुलकडे  जात होती.  तितक्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने बस ला  दिल्याने बस महिला १२ प्रवाशी गंभीर रित्या जखमी झाले.यात यात वंदना कुंभरे रा.वलनी,पुनम संदीपराव कोकोडे रा.वडकुली,सुधाकर बूधा गेडाम रा.बोर्डा दिक्षित,गणपती मार्कंडी सातपूते रा.जाम तुकूम,कासुबाई रुषी सातपूते रा.जाम तुकूम, काजल मुर्लिधर बूरांडे रा.जामखूर्द,कमलाबाई घोंगडे रा.जामखूर्द ,दशरथ वाल्मीक ढोले रा.कांतापेठ व चालक शरद पुनकटवार व वाहक कुंठावार हे गंभीर जखमी झाले.   सदर अपघात हा एका महिले सोबत होणार अपघात होता मात्र हा अपघात वाचविण्याच्या कारणाने झाला असल्याचकसाचे सांगण्यात येत आहे. अपघाता नंतर ट्रकचा चालक हा घटनास्थळावरून फरार होऊन पोलिसांच्या स्वाधीन झाला,अधिक तपास पोलीस करत असून अपघाताना  महामंडळ वाहतूक पोलीस निरीक्षक गोवर्धन यांनी घटनास्थळावर  पोहचून  तात्काळ जखमींना १ हजार रुपयाची तातडीची मदत दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.