Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २०, २०१७

आमदार चषक विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेत एकलव्य नागपूर संघ विजय

शशांक वानखेडे प्रो कबड्डी खेळाडू याची आमदार चषक वरोरा मध्ये दंगल.

शिरीष उगे वरोरा / भद्रावती (प्रतिनिधी)
वरोरा शहर येथे जय हिंद क्रीडा मंडळ च्या वतीने आयोजित आमदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आमदार चषक भव्य विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धचेे आयोजन करण्यात आले होते.  यात पुरुष व महिला  कबड्डी खेळाडूंनी कौशल्य दाखवून वरोरा वासीयाचे मन मोहून टाकले.
काल झालेल्या अंतिम  सामन्यादरम्यान  नागपूर येथील  एकलव्य नागपूर संघानी शिवाजी सेलू वर्धा या संघा ला मत करून विजय मिडविला. दरवर्षी वरोरा शहरांमध्ये विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सलग चार दिवस हे सामने  दिवस रात्र वरोरा शहरांमध्ये सुरू होते. विदर्भातील विविध शहरांमधून आलेल्या खेळाडूंचे स्वागत वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रातले आमदार बाळू धानोरकर यांनी केले . यावेळी लाखो रुपयांची रोख बक्षिसे  खेळाडूंना देण्यात आले. काल रविवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये नागपूरकरांनी बाजी मारली. अंतिम सामन्यांमध्ये नागपूरचे champion of champions  शशांक वानखेडे यांना बजाज कंपनीची दुचाकी देऊन सन्मानित करण्यात आले. एकलव्य संघाला  प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये देण्यात आले.   वरोरा शहरामध्ये पहिल्यांदाच भव्यदिव्य कबड्डी खेळाचे सामने वरोरा वासियांना पहावयास मिळाले. 

यावेळी स्पर्धकांना बक्षीस देण्यासाठी भद्रावती वरोरा निर्वाचन क्षेत्रातले आमदार बाळू धानोरकर ,भद्रावती नगरपालिका नगराध्यक्ष अनिल धानोरकर,  नरेंद्र नेमाडे, प्रकाश बाबू मुथा ,  दिलीप रामेडवार, विशाल बदखल, काशीफ खान, डॉ सागर वजे , राजू चिकटे, मनीष जेठानी, बाबा आगलावे, पुरुषोत्तम खिरटकर , राजू महाजन ,या मान्यवरांची उपस्थित कार्यक्रमाला लाभली होती.

वरोरा  येथील स्वर्गीय उत्तमराव मेश्राम मैदानावर गर्दी झाल्याने वरोरा पोलीस, जय हिंद क्रीडा मंडळ कार्यकर्ते, बाहेरून बोलावलेले गार्ड , व स्वतः आमदारसाहेबांनी ही गर्दी सांभाळण्यासाठी प्रयत्न केले हे विशेष.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.