Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०३, २०१७

भाजपा अनु.जाती मोर्चा महानगर कार्यकारणी जाहीर

आमदार नानाजी शामकुळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार 

चंद्रपूर/प्रतनिधी : 
 चंद्रपूर महानगर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर अध्यक्ष आमदार नानाजी शामकुळे यांनी नुकतीच भाजप अनु. जाती मोर्चा महानगर  कार्यकारणी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या सत्कार केला. यावेळी  चंद्रपूर शहर महानगर अनु. जाती मोर्चाचे अध्यक्ष तथा चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक अॅड राहुल अरूण घोटेकर यांची उपस्थिती होती.   

चंद्रपूर शहर महानगर अनु. जाती मोर्च्याच्या महामंत्री पदावर आयु.स्वप्नील रमेश कांबळे, धम्मप्रकाश जालीदर भस्मे, चंद्रपूर शहर महानगर अनु.जाती मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी मनिष सोंडवले; पराग राहुल कांबळे, दीप्तिकेश सुरेश निरंजने तर सचिव पदावर प्रशिक पडवेकर; मंडल अध्यक्ष बाजार वार्ड प्रवीण लांडगे; यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी  चंद्रपूर विधानसभा विस्तारक शिवाजी सेलोकर, राजेश ताजने,  अजय गणवीर, निलेश बेडेकर, विशाल राजकुमार पंजाबी, राजेश कोम्मला, आकाश अशोक धनुषकर, अमोल नगराळे  यांची उपस्थिती होती. 

सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर अनु. जाती मोर्च्याच्या विविध पदावर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांनी न्याय देत पुढे भारतीय जनता पार्टीचे ध्येय व धोरण सामान्य नागरिकांन पर्यंत पोहचविण्याचा तसेच अनुसूचित समाजाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याच्या संकल्प पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यकारिणीतील  पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून राज्याचे अर्थ नियोजन, वने तथा पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी पुढील वाटचालीकरिता शुभेच्या दिल्या.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.