Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ०९, २०१७

४० वर्षाच्या प्रयत्नांनी होणार नाली

चिमूर नगर परिषद अंतर्गत  इंदिरा नगरमध्ये भूमीपूजन 

चिमूर/तालुका प्रतिनिधी 
 चिमूर मध्ये सन १९७७ मध्ये इंदिरानगर नावाची  शासनाकडून  मिळालेली वसाहत असून या वार्ड कडे आज पर्यतच्या तत्कालीन ग्राम पंचायत सदस्यांनी दुर्लक्षित केले होते त्यामुळे येथील जनतेला सुविधा पासून वंचीत राहावे लागले याची दखल चिमूर नगर परिषद चे प्रथम नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी वारंवार इंदिरा नगर मधील सीमेंट नाली बांधकाम विषयी धारेवर धरत होते अखेर त्यांचे प्रयत्ना ला यश आले असून नुकतेच  नप विरोधी गट नेते अ कदिर शेख यांचे प्रमुख उपस्थितीत  जेष्ठ नागरीक मोहनजी करंडे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले  सदर नाली बांधकाम हे नप  निधी योजना मधील  असून ७२०  मीटर च्या चार नाल्या असल्याची माहिती दिली यावेळी पपु शेख , अरुण लांडे,माणिक चाफेकर ,सचिन लभाने, नाजीम पठाण, हुसेन शेख, प्रशांत बालपांडे आदी वार्डातील नागरिक उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.