आवारपूर/प्रतिनिधी :-
आपल्या द्वारे करण्यात आलेले रक्तदान हे इतरांचे प्राण वाचवू शकतो याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपला कोणी प्रिय व्यक्ती रक्ताच्या गरजेसाठी जीवन मृत्यशी संघर्ष करीत असतो. अपघात किंवा आजार हा कोणलाही होवू शकते. म्हनूनच रक्तदान सारख्या पून्यकार्या मध्ये सर्वांचे सहयोग मिळावे याच उदांतहेतूने स्थानिक अल्ट्राटेक वेलफेअर फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..
शिबिराचेे उदघाटन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूरचे युनीट हेड जी.बालसुब्रमण्यम, व सहाय्यक गटविकास अधिकारी कोरपना धनंजय साळवे यांनी रक्तदान करून उदघाटन केले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर चे फंक्शनल हेड आनंद लोहिया, अनिल पिल्लई, बी.पी. सग्गू, गजेंद्र सिंग, उपमहाव्यस्थापक कर्नल दिपक डे, साईनाथ बुच्चे सचिव कामगार संघ ए. सी.डब्ल्यू आवारपूर, यांच्या सहमान्यवर उपस्तिथ होते.
प्रसंगी अधिकारी व कामगार वर्ग यांनी उपस्थिती दर्शवून शिबीरास पुरेपूर सहकार्य करून रक्तदान केले. तसेच आवारपूर, नांदा, बिबी, बाखर्डी, भोयगाव, येथील युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचा माध्यमातून 260 नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी चंद्रपूर डॉ.मोहम्मद सैय्यद यांचा चमू नी सहकार्य केले..