रामटेक - कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या शिक्षणशास्त्रा तथा संकीर्ण विद्याशाखेद्वारे अध्यापन कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता विश्वविद्यालयाच्या रामटेक येथील मुख्यालयाच्या अतिथीगृह सभागृहात करण्यात येणार आहे.
कार्यशाळेचे आयोजक शिक्षणशास्त्रा आणि संकीर्ण विद्याशाखा असून समन्वयक या विद्याशाखेच्या अधिष्ठाता डाॅ. ललिता चंद्रात्रो आहेत. याच दिवशी विश्वविद्यालयाच्या रामटेक येथे स्थलांतरीत झालेल्या परीक्षा विभागाचे उद्घाटन कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डाॅ. कमल सिंग आणि विशेष अतिथी म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे संघटनमंत्राी श्रीमुकुलजी कानिटकर उपस्थित राहणार आहेत. कुलसचिव डाॅ. अरविंद जोशी यांची
विशेष उपस्थिती राहणार आहे.