Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २९, २०१७

कंडोम ठरले फेल;आता होणार नसबंदी

काव्यशिल्प/ ऑनलाइन:
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेशातील स्थानिक प्रशासनानं नवनव्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोहिंग्यांच्या शिबिरांमध्ये कंडोम वाटूनही उपयोग न झाल्यामुळं अखेर रोहिंग्यांची नसबंदी करण्याचा विचार पुढं आला आहे. त्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांविरोधात तेथील लष्करानं कारवाई सुरू केल्यामुळं निर्वासितांचे लोंढे शेजारी देशांमध्ये धडकत आहेत. सर्वाधिक रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. बांगलादेशातील निर्वासित शिबिरांमध्ये आजघडीला ६ लाखांहून अधिक रोहिंग्या मुसलमान राहत आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या या निर्वासितांना अन्न व पाण्यांच्या सुविधा पुरवणं कठीण जात आहे. अशा स्थितीत त्यांची संख्या वाढत राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळंच रोहिंग्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिंग्या मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे. कुटुंब नियोजनासारख्या गोष्टींपासून ते खूपच लांब आहेत. त्यामुळं त्यांची कुटुंबं मोठी आहेत. रोहिंग्यातील अनेक पुरुषांना एकापेक्षा अधिका बायका आहेत. काही लोकांना १९ पेक्षाही अधिक मुलं आहेत. याची गंभीर दखल घेऊन स्थानिक प्रशासनानं रोहिंग्यांच्या शिबिरात कंडोम वाटप केलं होतं. मात्र, त्याचा वापर होत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं स्थानिक प्रशासनानं केंद्र सरकारकडं नसबंदीची मोहीम राबवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.