Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर २१, २०१७

अब पुणे जाना है तो नो टेंशन

चंद्रपूर प्रतिनिधी:(ललित लांजेवार)
 चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून या गाडीचे आज  दुपारी दीड वाजता चंद्रपूर रेल्वे स्थानकावर प्रथमचढोल ताश्याच्या गजरात आगमन झाले.
  केंद्रीय भुपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या गाडीला नागपूर येथून व्हिडीओ काॅन्फरसिंगद्वारा हिरवी झेंडी दाखविली.तर  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ गाडी क्र. 22151 . ह्या गाडीचे चंद्रपूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले.

दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत केले.यावेळी  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर,भाजपचे चिमूर विधानसभाक्षेत्राचे आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया ,वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा,चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर अंजलीताई घोटेकर,उपमहापौर अनिल फुलजले, रेल्वेचे बडे अधिकारी व मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
 
गेल्या कित्येक वर्षांपासून बघीतल्या जाणारे पुणे गाडीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना यश आले आहे. चंद्रपूर येथून पुण्याकरिता थेट रेल्वे गाडी नसल्याने या जिल्हयातील व्यवसायी, उद्योजक, नोकरदार, विद्यार्थी व नागरिकांना प्रचंड असुविधा होत होती. गेल्या काही वर्षांपासून पुणे गाडी सुरू करण्याचा आग्रह रेल्वे सुविधा संघटनांच्या माध्यमातून हंसराज अहीर यांचेकडे करण्यात केला होता. त्याचे फलीत म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी  या गाडी सुरू करण्यास सहमती दर्शवीली व दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ही गाडी यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून दिली.
  सदर गाडीच्या आगनानिमित्त विविध स्थानकावर या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले  असून चंद्रपूर,बल्लारपूर,वरोरा रेल्वे स्थानकावर या गाडीच्या स्वागताचे आयोजन केले होते . या स्वागताकरिता चंद्रपूर शहरातील असंख्य नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात आपली उपस्थिती दर्शविली होती.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.