चंद्रपूर /पोंभुर्णा:
चेकठाणेवासना येथे शेतात फवारणी करत असतांना रोजनदराचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शेतकरी गणपत वारलुजी सातरे यांना देखील फवारणी करतांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.लगेच त्यांच्यावर उपचार करत त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले सुद्धा त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे
ते भोई समाजातील प्रतिष्ठीत .व्यक्ति असून ते चंद्रपूर जिल्हा मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू हजारे हे तत्काळ विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पोहोचले.
देवाडा येथील मस्त्य व्यावसायिक सह संस्थेचे ते अध्यक्ष असून ते अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झालेला असल्याने ते किटकनाशक औषधी फवारणी करित होते.
तालुक्यात औषध फवारणी करणा-या रोजदाराचा मृत्यू चेकठाणेवासना येथे घडली. ही घटना ताजी असतांनाच देवाडा खूर्द येथील शेतकरी गणपत वारलुजी सातरे यांना फवारणी करतांना विषबाधा होवून ते आजही अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर सरकारी इस्पीतळात उपचार सुरु आहे. ते भोई समाजातील असून ते चंद्रपूर जिल्हा मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.
देवाडा येथील मस्त्य व्यावसायिक सह. संस्थेचे ते अध्यक्ष असून ते अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील धानपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव झालेला असल्याने ते किटकनाशक औषधी फवारणी करित होते. ते आपल्या शेतीत फवारपणी करीत असतांना त्यांची प्रकृती अत्यन्त चिंताजनक झाली. मिळालेल्या माहितीवरून सध्यातरी रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी अजून तरी कोणीही प्रशासनाकडून कोणीही भेटण्यासाठी गेलेले नाही.यापूर्वी या क्षेत्राचे आमदार यांनी संबंधित विभागाला हे प्रकरण गांभीर्यांनी घेण्याचे निर्देश दिले असूनही या प्रकरणाकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना असा सवाल यावेळी उपस्थित होतो.