Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ११, २०१५

सरासरीपेक्षा पाऊस तरीही शेतकरी व्याकूळ

नागपूर : नागपूर शहरासह सर्व 13 तालुक्‍यांत जूनअखेर 191.46 मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र, 308 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 161 टक्‍के पाऊस झाला. पण, त्या मानाने जिल्ह्यातील जलायशे भरलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी व्याकूळ आहे.

जिल्ह्यात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 994.95 मिमी पाऊस पडतो. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात एकूण 1653.94 दलघमी संकल्पित जलसाठ्याची क्षमता आहे. जूनअखेर केवळ 374.2 (23 टक्‍के) जलसाठा भरला. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या सिंचन प्रकल्पांतील साठा तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची अपेक्षा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात थोडाफार फरक असलातरी तोतलाडोहची स्थिती बिकट आहे. येथे गेल्यावर्षी 42 टक्‍के जलसाठा होता. मात्र, सध्या केवळ 14 टक्‍केच साठा भरला.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असलातरी शेतीची स्थिती बिकट आहे. उघडीप घेणाऱ्या पावसामुळे पेरणी केलेली बियाणे उगविले नाहीत. ज्या शेतातील बियाणे उगविले ती रोप पाण्याअभावी वाळली. त्यामुळे दुबार पेरणीची शक्‍यता निर्माण झाली आहे. सरासरीपेक्षा सर्वांत जास्त पाऊस नागपूर ग्रामीण तालुक्‍यातील बुटीबोरी, वाडी परिसरात, तर सर्वांत कमी पाऊस भिवापूर तालुक्‍यात झाला.

पावसाची टक्‍केवारी याप्रमाणे, नागपूर शहर 208, नागपूर ग्रामीण 255, कामठी 132, हिंगणा 136, काटोल 132, नरखेड 143, सावनेर 185, कळमेश्‍वर 141, रामटेक 119, पारशिनी 195, मौदा 174, उमरेड 146, भिवापूर 94, कुही 202 टक्‍के पाऊस झाला.

मोठे प्रकल्प 
प्रकल्प ......... संकल्पित साठा .. सध्याचा साठा ..... टक्‍केवारी 
तोतलाडोह .... 1017 ............... 143 ............... 14 
कामठी खैरी .... 142 ................ 85 .................. 60 
रामटेक ......... 103 ................. 33 ................. 32 
लोवर .......... 53 ...................... 5 ................ 9 
वडगाव .......... 135 ................... 50 ................ 37 

मध्यम प्रकल्प 
चंद्रभागा ......... 8.26 ............ 4.23 ............... 51 
मोरधाम.......... 4.95 ............. 2.35 ............. 47 
केसरनाला ........ 3.93 ............. 0.62 ............. 16 
उमरी ............. 5.14 .............. 1.00 ............. 19 
कोलार ........... 31.32 ............ 6.12 ............ 20 
खेकरानाला ...... 23.81 ............ 4.94 ............ 21 
वेणा .............. 21.64 ............ 9.81 ............ 45 
कान्होलीबारा ..... 20.49 ............ 1.34 ........... 7 
पांढराबोडी ......... 13.13 .......... 1.90 ........... 14 
मकरधोकडा ...... 18.93 ........... 1.63 ............ 9 
सायकी ............ 6.98 .............. 0.34 ........... 0 
जाम ............... 24.30 ............. 10.85 ........ 45 
कार ............... 21.30 .............. 12.90 ..... 61

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.