Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०८, २०१५

बाबुपेठ उड्डाण पुलासाठी ५ कोटी मंजूर

इको-प्रो ने केले होते आंदोलन

चंद्रपूर : बहुप्रतीक्षित बाबुपेठ उड्डाण पुलाला शासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत महानगरपालिकांना अनुदान या शिषातंर्गत हा निधी मंजूर करण्यात असून उड्डाण पूल बांधकामाचा मार्ग आता सुकर झाला आहे.
मागील १५ ते २0 वर्षांपासून बाबुपेठ येथे रेल्वे उड्डाण पुल बांधकामाची मागणी सातत्याने होत आहे. यासाठी अनेकवेळा उपोषण, आंदोलन, मोर्चेही काढण्यात आली. इको-प्रो तथा अनेक संस्था संघटनांनी आंदोलन उभे करून ही मागणी शासन दरबारी रेटून धरली. राजकीय स्वार्थासाठी अनेकवेळा या पुलाची मागणी मागे पडत गेली. मात्र आता या पुलाला मंजुरी मिळून निधीही मंजूर झाला आहे.
नगरविकास विभागाच्या ४ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील महानगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांच्या विकास कामांसाठी विशेष अनुदान देण्याच्या बाबीअंतर्गत निधी मंजूर केला. यात बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांना बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सदर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देत नगरविकास विभागाने उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी रूपये मंजूर केले. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित मागणीच्या पुर्ततेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.