Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १०, २०१५

आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह

नागपूर : गळा दाबून मुलीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या वडिलास पोलिसांनी अटक केली. दीपक नागोराव पाटील (वय 45) असे आरोपीचे नाव आहे.
केळवद येथून 36 किमी अंतरावरील बुधला येथे प्रिया दीपक पाटील या 14 वर्षीय बालिकेचा सात एप्रिलला जळून मृत्यू झाला होता. या घटनेची तक्रार मुलीचे काका बबन नागोराव पाटील (वय 36) यांनी केळवद पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचा गळा दाबल्याने तिची श्‍वसननलिका बंद झाली. त्यात तिचा मृत्यू झाला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.