Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर ०४, २०१४

दक्षिण आफ्रिकेमध्ये रक्षा खडसे यांचे भाषण

मंबाथो दि. 4 : राष्ट्रकुल युवा संसद सदस्यांच्या अधिवेशनामध्येरावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी "भारतीयलोकशाही आणि सुशासन" या विषयावर आपले विचार मांडले.
याअधिवेशनाची सुरुवात काल दि. 2 नोव्हेंबर, 2014 रोजी दक्षिण आफ्रिकेच्यावायव्य प्रांताच्या "मंबाथो" येथील विधिमंडळ सभागृहात झाली. यावेळीवायव्य प्रांताच्या विधिमंडळाच्या अध्यक्षा सुसाना रिबेका तसेच विविधराष्ट्रकुल देशांच्या संसद तसेच विधिमंडळातून आलेले युवा संसद तसेचविधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांनी"भारतीय लोकशाही व सुशासन" या विषयावर आपले विचार मांडतानाजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील संसद सदस्य तसेच विधिमंडळसदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यासदस्यांची निवड प्रक्रिया यावर सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारतासारख्या मोठ्या व खंडप्राय देशामध्ये सुशासनराहण्यासाठी राजकीय व्यवस्था, कार्यकारी व प्रशासकीय व्यवस्था,न्यायपालिका व प्रसिध्दी माध्यमांची भूमिका कशी महत्वाची आहे, याबाबतविस्तृतपणे माहिती दिली. केंद्र आणि राज्य यांच्यामधील संबंध तसेचकायदा करण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना संबोधित केले. भारतामध्येपंचायती राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणिग्रामपंचायत या त्रिस्तरीय रचनेमधील राजकीय पक्षांची व प्रशासनाचीभूमिकेचे महत्व विशद केले. भारतातील राजकीय व प्रशासकीयव्यवस्थेमध्ये सुशासन आणण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्यासुधारणांबाबतही आपले मत व्यक्त केले.
rakshatai.jpg प्रदर्शित करत आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.